अल्लू अर्जुनच्या घराच्या मोडतोडप्रकरणी वडिलांनी दिली पहिली प्रतिक्रिया!

On: December 23, 2024 11:09 AM
Allu Aravind reacts to attack
---Advertisement---

Allu Aravind reacts to attack l ‘पुष्पा 2 द रुल’ या चित्रपटाने सिनेसृष्टीत प्रचंड धुमाकूळ घातला. मात्र या चित्रपटाचा प्रीमियर 4 डिसेंबरला हैदराबाद येथील ‘संध्या’ थिएटरमध्ये आयोजित करण्यात आला होता. मात्र यावेळी एका महिलेचा मृत्यू झाला तर तिचा आठ वर्षांचा मुलगा जखमी झाला. मात्र या घटनेचे पडसाद अजूनही उमटत आहेत.

अल्लू अरविंद यांनी दिली प्रतिक्रिया :

अशातच काल हैदराबाद या ठिकाणी असलेल्या अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला करण्यात आला आहे. तसेच यावेळी घरात घुसून तोडफोड करण्यात आली आहे. मात्र यावेळी अल्लू अर्जुनने या प्रकरणात आपला काहीही दोष नाही जे घडलं ते खेदजनक आहे, त्यासाठी मी माफीही मागतो असं देखील म्हटलं आहे. परंतु, आता या घटनेनंतर अल्लू अर्जुन विरोधात अद्यापही उद्रेक पाहायला मिळत आहे.

काल (21 डिसेंबरला) अल्लू अर्जुनच्या घराची तोडफोड करण्यात आली. मात्र आता या घराच्या मोडतोडीच्या घटनेनंतर अल्लू अर्जुनचे वडील अल्लू अरविंद यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच यावेळी या घटनेतील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्याविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

Allu Aravind reacts to attack l अशा घटनांना कोणीच प्रोत्साहन देऊ नये :

या प्रकरणावर अल्लू अरविंद म्हणाले की, “आमच्या घरात तोडफोड केली आहे ते प्रत्येकाने पाहिलं आहे. पण या घडीला आम्हाला अत्यंत विचारपूर्वक वागावं लागणार आहे. कारण आमच्यासाठी आता कोणतीही प्रतिक्रिया देण्याची ही योग्य वेळ नसल्याचं त्यांनी म्हंटल आहे.”

याशिवाय या घटनेतील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई देखील केली जाणार आहे. तसेच आमच्या घराजवळ येऊन जो कोणी गोंधळ निर्माण करेल. त्यांच्यावर देखील पोलीस कारवाई करतील. त्यामुळे अशा घटनांना कोणीच प्रोत्साहन देऊ नये. त्यामुळे आता संयमाने वागण्याची ही वेळ असल्याचं अल्लू अरविंद म्हणाले आहेत.

News Title : Allu Arjun father Allu Aravind reacts to attack on their Hyderabad home 

महत्वाच्या बातम्या –

महिलांची संक्रांत गोड होणार, जानेवारीतच मिळणार लाडकी बहीण योजनेचे पैसे?

“महात्मा गांधी पाकिस्तानचे राष्ट्रपिता, ते चुकून भारताचे…”; प्रसिद्ध गायकाचं वादग्रस्त वक्तव्य

महाराष्ट्रातील राजकारण तापणार?; राहूल गांधी आज परभणीत, सूर्यवंशी कुटुंबाला भेटणार

छगन भुजबळांची पुढील भूमिका ठरली?, शरद पवारांचं कौतुक करत म्हणाले…

पुणे हादरलं! मद्यधुंद डंपर चालकाने फुटपाथवर झोपलेल्यांना चिरडलं, मृतांचा आकडा समोर

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now