हैदराबाद, 13 डिसेंबर 2024 – तेलुगु सिनेमाचा एक प्रमुख अभिनेता म्हणून ओळखले जाणारे अल्लू अर्जुन (Allu Arjun) यांना एक धक्कादायक घटनेमुळे अटक करण्यात आली आहे. या घटनेची पार्श्वभूमी आणि अल्लू अर्जुनच्या करियरचा थोडक्यात आढावा घेऊया.
Allu Arjun ला अटक का झाली?
4 डिसेंबर 2024 रोजी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा 2: द रूल’ ची स्क्रिनिंग चालू असताना, अल्लू अर्जुन अचानक थिएटरमध्ये दाखल झाले, ज्यामुळे तिथे उपस्थित प्रेक्षकांमध्ये चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत एक 39 वर्षीय महिला मृत्युमुखी पडली, तिचा 8 वर्षीय मुलगा जखमी झाला. या घटनेनंतर महिलाच्या कुटुंबाने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी अल्लू अर्जुन (Allu Arjun), त्यांच्या सुरक्षा टीम आणि थिएटर व्यवस्थापन विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी अल्लू अर्जुन विरुद्धच नाही तर थिएटर मालक सहित तीन जणांना आधीच अटक केली होती. अल्लू अर्जुनने ही घटना झाल्यानंतर महिलाच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले होते आणि त्यांनी मृत महिलेच्या कुटुंबाला 25 लाख रुपयांची मदत दिली होती.
कोण आहे Allu Arjun?
अल्लू अर्जुन हे तेलुगु सिनेमातील एक प्रमुख आणि सर्वात जास्त मानधन घेणारे अभिनेते आहेत. त्यांचा जन्म 8 एप्रिल 1982 रोजी झाला. अल्लू अर्जुनने त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 2003 मध्ये ‘गंगोत्री’ या सिनेमाने केली होती. त्यानंतर त्यांनी ‘आर्या’ (2004), ‘बन्नी’ (2005), ‘देसामुदुरु’ (2007) आणि ‘परुगु’ (2008) सारख्या सिनेमांमधून आपली ओळख निर्माण केली.
अल्लू अर्जुनच्या काही अत्यंत यशस्वी सिनेमांमध्ये ‘वेदम’ (2010), ‘जुलाई’ (2012), ‘रेस गुर्रम’ (2014), ‘एस/ओ सत्यमूर्ती’ (2015), ‘रुद्रमादेवी’ (2015), ‘सरैनोडु’ (2016), ‘DJ: दुव्वडा जगन्नाधम’ (2017) आणि ‘अला वैकुंठपुरमुलू’ (2020) यांचा समावेश होतो. त्यांच्या सर्वात मोठ्या यशस्वी सिनेमांमध्ये ‘पुष्पा: द राइज’ (2021) आणि ‘पुष्पा 2: द रूल’ (2024) यांचा समावेश आहे.
अल्लू अर्जुनचे प्रसिद्ध सिनेमे
अल्लू अर्जुनच्या कारकिर्दीत अनेक यशस्वी सिनेमे आहेत, ज्यामुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ‘आर्या 2’ (2009), ‘वेदम’ (2010) आणि ‘रेस गुर्रम’ (2014) सारख्या सिनेमांमधील त्यांच्या अभिनयाने त्यांना दोन फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. ‘रुद्रमादेवी’ (2015) मधील त्यांच्या अभिनयासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार फॉर बेस्ट सपोर्टिंग एक्टर मिळाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
एकनाथ शिंदेंच्या खुर्चीला इतिहासात महत्त्व राहिलेलं नाही; शिंदेंच्या बड्या नेत्याचं वक्तव्य
शिवसेनेला 9 कॅबिनेट तर 3 राज्यमंत्रीपदं?, संभाव्य मंत्र्यांची यादी समोर
शरद पवारांचे 5 खासदार फोडा, तरच अजितदादांना केंद्रात मंत्रीपद?, खळबळजनक दावा समोर
ब्रेकिंग! ‘पुष्पा 2’ चित्रपटामुळे अल्लू अर्जुनला अटक?
“आमदारांसाठी रुग्णवाहिका तयार ठेवा, मंत्रीमंडळ विस्तारात…”; संजय राऊतांनी डिवचलं






