ब्रेकिंग! ‘पुष्पा 2’ चित्रपटामुळे अल्लू अर्जुनला अटक?

On: December 13, 2024 1:09 PM
Allu arjun arrested
---Advertisement---

Allu Arjun Arrested l जगभरात धुमाकूळ घातलेल्या ‘पुष्पा 2’ चित्रपटातील अभिनेत्यासंदर्भात एक म्हह्त्वाची बातमी समोर आली आहे. यावेळी साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरी प्रकरणासंदर्भात हैदराबादमधील चिक्कडपल्ली पोलिसांनी अटक केली आहे.

Allu Arjun Arrested l नेमकं काय घडलं? :

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, 4 डिसेंबर 2024 रोजी संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा 2’ या चित्रपटाचा प्रीमिअर शो आयोजित करण्यात आला होता. यावेळी अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. मात्र यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 35 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

मात्र या घटनेप्रकरणी अल्लू अर्जुनविरोधात एफआयआर देखील दाखल करण्यात आली होती. मात्र याविरोधात बुधवारी त्याने तेलंगणा उच्च न्यायालयात धाव देखील घेतली होती. परंतु हैदराबाद येथील संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा 2’च्या प्रीमिअर शो दरम्यान चेंगराचेंगरीत श्वास गुदमरल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी अल्लू अर्जुन विरोधात दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती.

तीन जणांना अटक :

मात्र त्यानंतर पोलिसांनी अल्लू अर्जुन, सुरक्षा टीम आणि थिएटर व्यवस्थापनाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 105 आणि 118 (1) अंतर्गत चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तसेच मृत महिलेच्या कुटुंबीयांनी थेट अल्लू अर्जुनविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

मात्र या घटनेच्या तपासादरम्यान पोलिसांनी थिएटर मालकांपैकी एक, थिएटरचे वरिष्ठ व्यवस्थापक आणि थिएटरच्या खालच्या बाल्कनीचे प्रभारी अशा एकूण मिळून तीन जणांना अटक केली आहे. तर साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनने एफआयआर रद्द करण्याची याचिका दाखल करत याचिका निकाली निघेपर्यंत अटकेसह पुढील सर्व कारवाईला स्थगिती देण्याची विनंती देखील केली आहे.

News Title – Allu Arjun Arrested 

महत्त्वाच्या बातम्या-

फडणवीसांची लाडकी बहीण विधानपरिषदेवर; ‘या’ बहिणीला गिफ्ट मिळणार?

वर्ल्ड चॅम्पियन गुकेशची नेटवर्थ किती?, आकडा ऐकून चकित व्हाल

दत्त जयंती 14 की 15 डिसेंबरला; जाणून घ्या नेमकी कधी?

राज्यात पुन्हा राजकीय भूकंप?, दिल्लीत भाजप व शरद पवार गटातील ‘या’ बड्या नेत्यांची गुप्त भेट

काळजी घ्या! राज्यात ‘या’ तारखेपासून गारठा वाढणार?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now