‘भगव्या सरकारने…’ भारताच्या कारवाईनंतर अल-कायदाची भारताला थेट धमकी

On: May 8, 2025 10:32 AM
Al-Qaeda
---Advertisement---

Operation Sindoor | भारताने (India) केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) कारवाईनंतर, आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना अल-कायदाच्या (Al-Qaeda) भारतीय उपखंडातील शाखेने (AQIS) तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. अस-सहाब मीडियाद्वारे (As-Sahab Media) जारी केलेल्या निवेदनात, त्यांनी भारताला (India) पोकळ धमकी देत मुस्लिमांना भारताविरुद्ध (India) जिहाद करण्याचे आवाहन केले आहे.

अल-कायदाचा भारतावर आरोप

अल-कायदाच्या (Al-Qaeda) भारतीय उपखंड शाखेने (AQIS – Al-Qaeda in the Indian Subcontinent) आपल्या प्रसिद्धी माध्यमाद्वारे, अस-सहाब मीडिया (As-Sahab Media), एक निवेदन जारी केले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, ६ मे २०२५ च्या रात्री भारतातील ‘भगव्या सरकारने’ पाकिस्तानमधील (Pakistan) सहा ठिकाणी हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये विशेषतः मशिदी आणि रहिवासी भागांना लक्ष्य करण्यात आले, ज्यात अनेक मुस्लिम शहीद झाले आणि जखमी झाले, असा दावा त्यांनी केला आहे.

“आम्ही अल्लाहचे आहोत आणि त्याच्याकडेच परत जाणार आहोत. अल्लाह शहिदांना स्वर्गात जागा देवो आणि जखमींना लवकर बरे करो,” असे म्हणत त्यांनी या हल्ल्याला ‘भगव्या सरकारच्या गुन्ह्यांच्या यादीतील आणखी एक काळा अध्याय’ म्हटले आहे. हा भारताच्या इस्लाम आणि मुस्लिमांविरुद्धच्या कथित युद्धाचा भाग असल्याचा खोटा प्रचारही त्यांनी केला.

जिहादचे आवाहन, बदल्याची धमकी

आपल्या निवेदनात AQIS ने म्हटले आहे की, “भारतातील इस्लाम आणि मुस्लिमांविरुद्धचे युद्ध नवीन नाही, ते वर्षानुवर्षे सुरू आहे. भारत आणि काश्मीरमधील (Kashmir) मुस्लिमांवर अन्याय होत असून, मोदी सरकार (Modi Government) सैन्य, राजकीय, सांस्कृतिक आणि मीडियाच्या माध्यमातून इस्लाम आणि मुस्लिमांना संपवण्याचा डाव आखत आहे.”

या खोट्या प्रचाराचा आधार घेत, अल-कायदाने (Al-Qaeda) मुस्लिमांना भारताविरुद्ध  जिहाद करण्याचे आवाहन केले आहे. “अल्लाहचे नाव अजून मजबूत करण्याची वेळ आली आहे. अल्लाहच्या मदतीने आम्ही शेवटपर्यंत लढत राहू आणि या हल्ल्याचा बदला घेऊ,” अशी पोकळ धमकी त्यांनी दिली आहे. भारताने (India) ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये (Operation Sindoor) कामिकेझ ड्रोनचा (Kamikaze Drones) वापर करत पाकिस्तान (Pakistan) आणि पीओकेमधील (PoK) ९ दहशतवादी तळ (बहावलपूर, मुरीदके, चक अमरू, सियालकोट, भीमबेर, गुलपूर, कोटली, बाघ, मुझफ्फराबाद) उद्ध्वस्त केले होते.

Title : Al-Qaeda Threatens India Post-Operation Sindoor

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now