अक्षय्य तृतीया 2025: आज लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त कोणता?, खरेदी कोणत्या मुहूर्तावर करावी? संपूर्ण माहिती वाचा

On: April 30, 2025 8:17 AM
Akshaya Tritiya 2025 shubh muhurat
---Advertisement---

Akshaya Tritiya 2025 | आज 30 एप्रिल 2025 रोजी अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya 2025) हा सण गज केसरी, लक्ष्मी-नारायण राजयोग व सर्वार्थ सिद्धी योगात साजरा होत आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी मुहूर्ताची गरज नसते. या दिवशी लक्ष्मीपूजन, सुवर्ण खरेदी आणि दानाला विशेष महत्त्व आहे.

शुभ योग

वैदिक पंचांगानुसार, वैशाख शुक्ल पक्षातील तृतीया तिथी 29 एप्रिल संध्याकाळी 5:31 वाजता सुरू झाली असून 30 एप्रिल रोजी संपूर्ण दिवसभर राहणार आहे. यंदाची अक्षय्य तृतीया गज केसरी योग, सर्वार्थ सिद्धी योग, लक्ष्मी-नारायण योग आणि अक्षय योगासारख्या शुभ संयोगांमध्ये येत आहे. चंद्र वृषभ राशीत आणि गुरु त्याच्यासोबत असल्याने अत्यंत फलदायी योग निर्माण झाला आहे.

त्यामुळे अक्षय्य तृतीया ‘स्वयं सिद्ध मुहूर्त’ म्हणून ओळखली जाते, म्हणजेच या दिवशी विवाह, गृहप्रवेश, वाहन खरेदी, व्यवसायाची सुरुवात अशा सर्व गोष्टी मुहूर्त न पाहता करता येतात. या दिवशी सोने किंवा चांदीची खरेदी केल्याने घरात संपत्ती आणि सौख्य वाढते, अशी श्रद्धा आहे.

खरेदीचे योग्य मुहूर्त व दानाचे महत्त्व

लक्ष्मी पूजनासाठी उत्तम काळ सकाळी 7:19 ते 8:58 वाजेपर्यंत आहे. त्यानंतर 10:37 ते 12 वाजेपर्यंत शुभ चौघडिया आणि 1:56 ते 3:35 वाजेपर्यंत अमृत चौघडिया आहे. अभिजित मुहूर्त सकाळी 11:36 ते 12:24 वाजेपर्यंत आहे, जो खरेदीसाठी अत्यंत शुभ आहे. मात्र, 12:16 ते 1:30 वाजेपर्यंत राहुकाल असल्याने या काळात खरेदी टाळावी.

आज सर्वार्थ सिद्धी योगात केलेले जप, तप आणि पूजन नेहमी फलदायी ठरते. शोभन योगात भगवान विष्णूची पूजा केल्यास सुख, समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते. सूर्याच्या प्रभावामुळे रवि योगात केलेली कामे यशस्वी होतात. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्याला अर्घ्य देण्याची परंपरा आहे. यामुळे सूर्य बळकट होतो आणि प्रतिष्ठा व आर्थिक स्थैर्य प्राप्त होते. (Akshaya Tritiya 2025)

या दिवशी गुळ, तांदूळ, अन्नधान्य, पाणी, वस्त्र, सोने, चांदी, तूप यांचे दान केल्याने ‘अक्षय’ म्हणजे कधीही न संपणारे पुण्य मिळते, असे मानले जाते. त्यामुळे या दिवशी दान करण्याचे विशेष महत्त्व आहे.

 Title : Akshaya Tritiya 2025 Puja Timings, Shopping Muhurat and  Donations

 

Join WhatsApp Group

Join Now