Akshaya Tritiya 2025 | 30 एप्रिल 2025 रोजी येणाऱ्या अक्षय्य तृतीयाला (Akshaya Tritiya 2025) अनेक शुभ योग तयार होत आहेत. या दिवशी सोनं घेणं शक्य नसेल, तरीही काही गोष्टींची खरेदी टाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या दिवशी केलेल्या खरेदीचे दीर्घकाळ सकारात्मक परिणाम होतात, म्हणूनच योग्य वस्तूंची निवड गरजेची आहे.
सोनं नसलं तरी शुभ खरेदी करा
हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेला (Akshaya Tritiya) विशेष महत्त्व दिलं जातं आणि या दिवशी नवी सुरुवात करणे, जमीन विकत घेणे, दागिने व इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. यंदाची अक्षय्यतृतीया शोभन योग, लक्ष्मीनारायण, गजकेसरी आणि सर्वार्थ सिद्धी योगाने परिपूर्ण आहे, ज्यामुळे केलेली खरेदी अत्यंत फलदायी ठरणार आहे.
जे लोक सोनं किंवा चांदी खरेदी करू शकत नाहीत, त्यांच्या साठीही धार्मिक ग्रंथांमध्ये उपाय सुचवले आहेत. या दिवशी अन्नधान्य, गहू, गूळ, डाळी, तूप, श्रीयंत्र, पिवळी मोहरी आणि माठ (मडके) यांसारख्या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. यामुळे धनवृद्धी व समृद्धीचा आशिर्वाद मिळतो असे मानले जाते.
या गोष्टींची खरेदी टाळा
अक्षय्यतृतीयेला (Akshaya Tritiya) काही वस्तूंची खरेदी करणे अशुभ ठरू शकते. या दिवशी एल्युमिनियम, स्टील किंवा प्लास्टिकची भांडी घेणे टाळावे. याशिवाय, काळ्या रंगाचे कपडे विकत घेणे देखील या दिवशी टाळायला हवे, कारण काळा रंग अशुभ मानला जातो.
तसेच, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी काटेरी झाडं किंवा रोपे घरी आणणे टाळावे, कारण ते घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. ‘अक्षय’ या शब्दाचा अर्थ कधीही संपणार नाही असा आहे आणि त्यामुळे या दिवशी केलेली दानधर्म, पूजा आणि खरेदी दीर्घकाल टिकते. (Akshaya Tritiya 2025)
Title: Akshaya Tritiya 2025 know What Not to Buy on This Day






