Akshay Shinde Encounter l बदलापूर शाळेत दोन मुलींवर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीत मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यावेळी मृत आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांकडील पिस्तुल हिसकावून अंदाधुंद तीन गोळ्या झाडल्या. मात्र यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याच्या पायाला गोळी लागल्याने तो जखमी झाला होता. मात्र त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे ठार झाला होता. मात्र या एन्काऊंटरबाबत विरोधक आणि न्यायालयाने अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. अशातच आता या प्रकरणावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं मत मांडल आहे.
आरोपीने हल्ला केला तर पोलीस टाळ्या वाजवत बसणार नाहीत :
यासंदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं बेधडक मत मांडत पोलिसांच्या कृतीचे समर्थन देखील केले आहे. जर एखाद्या आरोपीने हल्ला केला तर त्याला पोलीस टाळ्या वाजवत बसणार नाहीत. तसेच एखाद्या आरोपीचा एन्काउंटर व्हावा, या मताचे आम्ही नाहीत. मला व्यक्तिश: कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात कायद्याचे पालन व्हावे असे नेहमी वाटते.
कारण कायद्याच्या माध्यमातूनच गुन्हेगारावर शासन कारवाई झाली पाहिजे. ही सगळी प्रक्रिया प्रचंड वेगाने पार पडली पाहिजे. तसेच बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा मृत्यू पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात झाला आहे. तसेच अशा प्रकारामध्ये आमचे पोलीस एखाद्याने हल्ला केल्यावर टाळ्या वाजवत बसणार नाहीत असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले आहे.
Akshay Shinde Encounter l गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे बॅनर लावून गौरव :
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर मुंबई, ठाणे आणि बदलापूर परिसरात अनेक ठिकाणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचे बॅनर्स झळकले होते. तसेच या बॅनर्सवर ‘बदला पुरा’, ‘देवाचा न्याय’, ‘देवाभाऊ सुपरफास्ट’ अशा उपाध्या देऊन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राज्याचे गृहमंत्री म्हणून गौरव करण्यात आला होता.
याविषयी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी म्हटले की, हा प्रकार मात्र अयोग्य आहे. एन्काउंटरसारख्या घटनेचे उदात्तीकरण कधीच होता कामा नये असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहेत. याशिवाय या एन्काउंटरची गुन्हे अन्वेषण विभागाकडून देखील (CID) नि्ष्पक्ष चौकशी होईल असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
News Title – Akshay Shinde Encounter Statement On Devendra Fadanvis
महत्त्वाच्या बातम्या-
धक्कादायक! पुण्यात महाविद्यालयीन मुलीवर चौघांकडून अत्याचार
‘तारक मेहता..’च्या निर्मात्यांवर पुन्हा शोषणाचे आरोप, ‘या’ अभिनेत्रीने सोडली मालिका
भाजपकडून अजितदादा गटाची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न?, ‘या’ नेत्याला केंद्रात मिळाली मोठी जबाबदारी
लाडक्या बहीणींसाठी गुड न्यूज, योजनेसाठी अर्ज करण्यास मिळणार मुदतवाढ?
आज शिवयोगात ‘या’ राशींचं भाग्य फळफळणार, सर्व गोष्टीत यश मिळणार!






