‘आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही’; संजय शिंदेेंनी केला गौप्यस्फोट

On: September 24, 2024 3:16 PM
Akshay Shinde Encounter
---Advertisement---

Akshay Shinde | बदलापूर येथील शाळेत केलेल्या अत्याचार प्रकरणाआधी आरोपी अक्षय शिंदे यांच्यावर अन्य दोन बलात्काराचे गुन्हे दाखल होते. बदलापूर प्रकरणात न्यायालयीन कोठडीतून त्याची पोलिसांनी कस्टडी मिळवली होती. दरम्यान, काल (23 स्पटेंबर) रोजी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. घडलेल्या प्रकरामुळे राज्यात एकच चर्चा सुरु आहे. मात्र, आता अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करणारे संजय शिंदे यांनी एक मोठा खुलासा केला.

नक्की काय घडलं?

अक्षय शिंदेला (Akshay Shinde) तळोजा कारागृहातून घेऊन येत असताना त्याच्यावर पोलिसांनी गोळ्या झाडल्या. आधी अक्षयने पोलिसांवर गोळीबार केला नंतर आपल्या रक्षणासाठी पोलिसांनी अक्षयवर गोळी झाडून त्याची हत्या केली. एन्काऊंटर स्पेशालिस्ट संजय शिंदे यांनी अक्षयवर गोळी झाडली. मात्र, त्याआधी नेमकं काय घडलं? याबद्दल संजय शिंदे यांनी मोठा खुलासा केला.

काय म्हणाले संजय शिंदे?

संजय शिंदे म्हणाले की “पिस्तुल हिसकावताना सुरू असलेल्या झटापटीत आरोपी अक्षय शिंदे हा त्यावेळी मला जाऊ द्या, असं म्हणत होता. झटापटीमध्ये सपोनि निलेश मोरे यांचे पिस्तुल लोड झाले व त्यातील 1 राउंड हा सपोनि निलेश मोरे यांच्या डाव्या मांडीमध्ये घुसल्याने ते खाली पडले. त्यावेळी आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) याने निलेश मोरे यांचे पिस्तुलचा ताबा घेऊन “आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही” असे रागारागाने ओरडून आम्हाला बोलू लागाला, त्यानंतर आरोपी अक्षय शिंदे याने माझे व हरिश तावडे यांच्या दिशेने त्याचे हातातील पिस्तूल रोखून आम्हाला जीवे मारण्याच्या उद्देशाने आमच्यावर 2 गोळ्या झाडल्या. परंतु आमच्या नशिबाने त्या गोळ्या आम्हाला लागल्या नाहीत.”

आरोपी अक्षय शिंदेचे रौद्र रुप व देहबोली पाहुन तो त्याच्याकडील पिस्तुलमधून आमच्यावर गोळ्या झाडून आम्हाला जीवे मारणार अशी माझी पूर्णपणे खात्री झाली म्हणून मी प्रसंगावधान राखत स्वसंरक्षणार्थ माझ्याकडील पिस्तुलाने एक गोळी आरोपी अक्षय शिंदे याच्या दिशेने झाडली, असं संजय शिंदे म्हणाला.

News Title : akshay shinde encounter specialist revealed truth

महत्त्वाच्या बातम्या-

अक्षय शिंदेच्या पोस्टमार्टमचा व्हिडीओ रेकॉर्डिंगमधून खुलासा होणार?

बाजारात ‘या’ मोबाईल कंपनीने उडवली खळबळ; 5000GB डेटा मिळणार

अक्षय शिंदेवर गोळी झाडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा FIR मध्ये मोठा खुलासा!

सिद्धीविनायक मंदिरात घडलेल्या धक्कादायक प्रकारानंतर सगळीकडे खळबळ!

अक्षय शिंदेचा पोलिसांसोबतचा व्हिडीओ आला समोर!

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now