“मृतदेह ताब्यात घेणार नाही..”; अक्षय शिंदेच्या आईचे पोलिसांवरच गंभीर आरोप

On: September 24, 2024 9:01 AM
Akshay Shinde Encounter
---Advertisement---

Akshay Shinde Encounter | बदलापूर शाळेमधील दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा काल 23 सप्टेंबररोजी पोलिसांनी एन्काऊंटर केला. सेल्फ डिफेन्समध्ये पोलिसांनी त्याचा एन्काऊंटर केलाय.तळोजा कारागृहातून रिमांडसाठी नेत असताना अक्षयने पोलिसांकडे असलेली सर्व्हिस रिव्हॉल्वर खेचून तीन गोळ्या फायर केल्या. यामध्ये एपीआय निलेश मोरे यांच्या पायाला दुखापत झाली आहे. नंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी अक्षय शिंदेवर गोळी झाडली, यात त्याचा मृत्यू झाला. (Akshay Shinde Encounter )

अक्षय शिंदेच्या आईची मोठी मागणी

या प्रकरणी आता अक्षय शिंदेच्या आईची प्रतिक्रिया समोर आली आहे. अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर त्याच्या आईने पोलिसांवरच गंभीर आरोप केले आहेत. तसेच मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मृत अक्षय शिंदेचे आई आणि वडील हे कळवा रुग्णालयात दाखल झाले आहेत. अक्षयचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी जेजे रुग्णालयात नेण्यात येणार आहे.(Akshay Shinde Encounter )

यावेळी अक्षयच्या आईने पोलिसांवर काही आरोप केले आहेत. “मला अक्षयने पोलिस खूप मारत आहेत, मला लवकर बाहेर काढ असं दुपारीच सांगितलं. त्यामुळे पोलिसांनीच त्याला मारलंय. याची चौकशी व्हायला हवी”, असं अक्षय शिंदेच्या आईने म्हटलं आहे.

नेमकं घडलं काय?

बदलापूरमध्ये ऑगस्ट महिन्यात एका नामांकित शाळेतील दोन चिमुकल्या विद्यार्थिनींवर अत्याचार झाल्याचे प्रकरण समोर आले होते. या घटनेनंतर बदलापूर मध्ये मोठा राडा झाला होता. नागरिकांनी रेल्वे रुळावर उतरून आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेत राज्य शासनाने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी नेमली होती. या प्रकरणी तपास करून कल्याण न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

आता या प्रकरणात सोमवारी झालेल्या चकमकीत आरोपी अक्षय शिंदे ठार ( Akshay Shinde Encounter ) झाला आहे. त्याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. सोमवारी सायंकाळी पोलीस आरोपी अक्षय शिंदेला तळोजा कारागृहातून बाहेर घेऊन जात असताना त्याने पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला.त्यात पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ अक्षयवर गोळीबार केला. यात आरोपी अक्षय शिंदे ठार झाला आहे.

News Title : Akshay Shinde Encounter serious allegations against police

महत्वाच्या बातम्या –

“…तेव्हाच खऱ्या अर्थाने बदला पूर्ण होईल”, अमित ठाकरेंची पोस्ट चर्चेत

अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांना 51 हजारांचं बक्षीस, कुणी केली घोषणा?

आज कालाष्टमी, काल भैरव ‘या’ राशींच्या जीवनातील सर्व अडचणी दूर करणार!

एन्काऊंटरनंतर अक्षय शिंदेबद्दल आईने केला मोठा खुलासा!

“माझा पोरगा भोळाय, तो फटाक्याला घाबरतो, गोळी कशी चालवेल, त्याला पैसे देऊन मारलं”

Join WhatsApp Group

Join Now