अक्षय शिंदेवर गोळी झाडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा FIR मध्ये मोठा खुलासा!

On: September 24, 2024 2:18 PM
Akshay Shinde Encounter Sanjay Shinde Revelation
---Advertisement---

Akshay Shinde Encounter | बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) याचा काल 23 सप्टेंबररोजी पोलिसांनी एन्काऊंटर केला. पोलिसांवर त्याने आधी हल्ला केला. त्यामुळे पोलिसांनी बचावासाठी अक्षयवर गोळी झाडली, यात त्याचा मृत्यू झालाय. आता या घटनेबाबत मोठा खुलासा झाला आहे. (Akshay Shinde Encounter )

अक्षय शिंदेवर गोळ्या झाडणाऱ्या पोलीस अधिकारी संजय शिंदे यांचा एफआयआरमधील जबाब समोर आला आहे. यामध्ये त्यांनी धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत. या एफआयआरमध्ये कुणालाही सोडणार नाही, अशी धमकी अक्षयने दिल्याचा दावा संजय शिंदे यांनी केला आहे.

अक्षय शिंदेवर गोळी झाडणारे पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी जबाब नोंदवल्यानंतर मुंब्रा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षयने हवालदार महेश तावडे यांच्या दिशेने दोन राऊण्ड फायर केले. अक्षय आणखी गोळ्या झाडेल, अशी खात्री पटल्यामुळे आपण गोळ्या झाडल्या, असा दावा संजय शिंदे यांनी केला आहे.

संजय शिंदे यांनी जबाबात नेमकं काय म्हटलं?

सोमवारी सकाळी 5:30 च्या दरम्यान कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अक्षयला ताब्यात घेण्यात आलं. नंतर आम्ही ठाण्याचे दिशेने निघालो. या वेळी मी व्हॅनमध्ये पुढे बसलो होतो. तर, अक्षय आणि सपोनि निलेश मोरे आणि दोन अंमलदार अक्षयसोबत मागे बसले होते. आम्ही शिळ डायघर पोलीस ठाण्याजवळ आलो असताना निलेश मोरे यांनी मला त्यांच्या मोबाईल फोनवरुन फोन करुन आरोपी अक्षय शिंदे हा, मला तुम्ही पुन्हा कशासाठी घेऊन जात आहात? आता मी काय केले आहे?, असे रागाने बोलत असून शिवीगाळ करीत असल्याचे सांगितले.(Akshay Shinde Encounter )

पुढे वाहन थांबवून मी अक्षयला शांत करण्यासाठी मागे येऊन बसलो. सरकारी वाहनाने आम्ही मुंब्रा बायपास रोडवर मुंब्रा देवीच्या पायथ्याजवळ आलो. याचवेळी सायंकाळी 6.15 च्या सुमारास आरोपी अक्षय शिंदे हा अचानक निलेश मोरे यांच्या कमरेला पॅन्टमध्ये खोचलेले सरकारी पिस्तुल बळाचा वापर करुन खेचू लागला. अक्षय पिस्तूल घेण्याचा प्रयत्न करत होता. तसेच, मला जाऊन द्या, असं तो म्हणत होता.

झटापटीमध्ये सपोनि निलेश मोरे यांचे पिस्टल लोड झाले व त्यातील 1 राउंड हा सपोनि निलेश मोरे यांच्या डाव्या मांडीमध्ये घुसल्याने ते खाली पडले. याचवेळी अक्षयने निलेश मोरे यांचे पिस्तुल हिसकावून मी कुणालाही सोडणार नाही, असं म्हणू लागला. अक्षयने माझ्या आणि हरिश तावडे यांच्या दिशेने हातातील पिस्तूल रोखून आम्हाला जीवे मारण्याच्या उद्देशाने आमच्यावर 2 गोळ्या झाडल्या. पण, या गोळ्या आम्हाला लागल्या नाही.(Akshay Shinde Encounter )

अक्षयचे रौद्ररूप बघून तो आमच्यावर गोळ्या झाडणार, अशी माझी पूर्णपणे खात्री झाली म्हणून मी प्रसंगावधान राखत स्वसंरक्षणार्थ माझ्याकडील पिस्तुलाने एक गोळी आरोपी अक्षय शिंदे याच्या दिशेने झाडली. यामध्ये अक्षय जखमी होऊन तो खाली पडला. यादरम्यान अक्षयच्या हातातील पिस्तुलचा ताबा सुटला, त्यानंतर आम्ही आरोपी अक्षय शिंदे याच्यावर नियंत्रण मिळवले.

या सर्व घटनेनंतर वाहन जवळच्या छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पीटल, कळवा येथे आणून मी , अक्षय शिंदे व निलेश मोरे औषधोपचारसाठी दाखल झाले. त्यानंतर निलेश मोरे व मला पुढील औषधोपचारसाठी ज्युपीटर हॉस्पीटलला दाखल करण्यात आले. पण, आरोपी अक्षय शिंदे याचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे मला नंतर समजले, असं संजय शिंदे यांनी जबाबात सांगितलं आहे.(Akshay Shinde Encounter )

News Title : Akshay Shinde Encounter Sanjay Shinde Revelation

महत्त्वाच्या बातम्या-

सिद्धीविनायक मंदिरात घडलेल्या धक्कादायक प्रकारानंतर सगळीकडे खळबळ!

अक्षय शिंदेचा पोलिसांसोबतचा व्हिडीओ आला समोर!

अक्षयचं एन्काऊंटर कुठे झालं?, फॉरेन्सिक टीमला पोलीस व्हॅनमध्ये सापडला महत्त्वाचा पुरावा!

अक्षय शिंदेवर गोळी चालवणारा पोलीस ऑफीसर कोण?, महत्त्वाचं कनेक्शन समोर

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट!

Join WhatsApp Group

Join Now