Akshay Shinde Encounter | बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा काल 23 सप्टेंबररोजी पोलिसांनी एन्काऊंटर केला. सेल्फ डिफेन्समध्ये पोलिसांनी त्याचा एन्काऊंटर केलाय.तळोजा कारागृहातून रिमांडसाठी नेत असताना अक्षयने पोलिसांकडे असलेली सर्व्हिस रिव्हॉल्वर खेचून तीन गोळ्या फायर केल्या. नंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी अक्षय शिंदेवर गोळी झाडली, यात त्याचा मृत्यू झाला.या घटनेनंतर अक्षय शिंदेच्या आईने पोलिसांवर गंभीर आरोप करत मोठी मागणी केली आहे. (Akshay Shinde Encounter )
आमच्या पोराला पैसे देऊन ठार मारलं आहे. माझ्या पोराची भरपाई द्या, नाहीतर आम्ही सुद्धा तिथे येतो, आम्हालाही गोळ्या मारा, असं अक्षय शिंदेच्या आईने म्हटलं आहे. तसेच त्यांनी आम्हाला न्याय हवा, माझ्या पोराला पैसे देऊन मारण्यात आलं, असा गंभीर आरोप देखील केला आहे.
“माझ्या पोराला पैसे देऊन मारलं”
“आम्ही अक्षयला 3:30 वाजता जेलमध्ये भेटलो होतो. त्याने मला जेलमधून बाहेर कधी काढणार?, असं विचारलं. यावेळी त्याने मला एक कागद देखील दाखवला. त्यावर काहीतरी लिहिलेलं होतं. तो मला म्हणाला की, मम्मी तू हे वाचून घे. मला वाचता येत नाही, असं मी त्याला सांगितलं. तू इथेच आत राहा. वकील शोधून तुला आम्ही बाहेर काढू, असं मी माझ्या पोराला म्हटलं.”, अशी प्रतिक्रिया अक्षय शिंदेच्या आईने दिली आहे. (Akshay Shinde Encounter )
तसेच पुढे त्यांनी शाळा प्रशासनाबद्दल देखील मोठा आरोप केला आहे. आम्हाला बदलापूरमधील घरातून हाकलून दिलं आहे. स्टेशनवर आम्ही राहतोय. माझा पोरगा असं करूच शकत नाही. शाळेमध्ये दुसऱ्याने कुणी तरी हे केलं आहे. त्याच्यावर आरोप लावला आहे. 12,13 तारखेला ही घटना घडली. पण माझं पोरगं 17 तारखेला शाळेत गेला होता, असा खुलासा अक्षय शिंदेच्या आईने केला आहे.
अक्षय शिंदेच्या आईचा गंभीर आरोप
इतकंच नाही तर, माझ्या पोराला फटाके फोडता येत नाहीत, मग तो बंदूक कशी चालवणार आहे?,आता आम्हाला सुद्धा गोळ्या टाकून ठार मारून टाका. आम्ही पण मरणार त्याच्यासोबत. आम्ही एक वेळचं कमावून खाणारे लोक आहोत. शाळेतले लोक पळून गेले आहेत. त्यांना अटक कधी करणार?, असा सवाल अक्षय शिंदेच्या आईने केला आहे.(Akshay Shinde Encounter )
News Title : Akshay Shinde Encounter His mother made big revelation
महत्वाच्या बातम्या –
“मृतदेह ताब्यात घेणार नाही..”; अक्षय शिंदेच्या आईचे पोलिसांवरच गंभीर आरोप
“…तेव्हाच खऱ्या अर्थाने बदला पूर्ण होईल”, अमित ठाकरेंची पोस्ट चर्चेत
अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांना 51 हजारांचं बक्षीस, कुणी केली घोषणा?
आज कालाष्टमी, काल भैरव ‘या’ राशींच्या जीवनातील सर्व अडचणी दूर करणार!






