निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अक्षयची हत्या!; ‘या’ खुलाशाने सगळीकडे खळबळ

On: September 25, 2024 5:24 PM
Akshay Shinde Encounter
---Advertisement---

Akshay Shinde | बदलापूरातील नामांकित शाळेत शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर आत्याचार केलेल्या आरोपीचा मुंबई पोलिसांनी एन्काऊंटर केला. तळजो कारागृहातून अक्षयला घेऊन येत असताना मुंब्रा बायपासवर अक्षयचा एन्काऊंटर करण्यात आला. पोलिसांनी त्यांच्या रक्षणासाठी अक्षयवर गोळीबार गेल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, घडलेल्या प्रकरामुळे राजकारण चांगलंच तापलं आहे.

काय आहे प्रकरण?

विरोधी पक्ष नेते यांनी हा फेक एन्काऊंटर आहे असं म्हटलं आहे. तर अक्षयच्या (Akshay Shinde) चेहेऱ्यावर काळा कपडा आणि हातात हात घड्या असताना अक्षय पोलिसांवर गोळीबार कसं करु शकतो असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, अक्षयच्या आई-वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कोर्टात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. या वेळी काही खुलासे करण्यात आले आहेत.

नक्की काय घडलं?

अक्षय (Akshay Shinde) पळून जाण्याच्या स्थितीत नव्हता किंवा पोलीस अधिकाऱ्याकडून पिस्तूल हिसकावून घेण्याची त्याची शारीरिक क्षमताही नव्हती. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या मुलाची हत्या करण्यात आली आहे, असा दावा वकिलांनी केला. हा फेक एन्काऊंटर झालाय. न्यायालयाने या प्रकरणात विषेश पथक दाखल करावे, या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी वकिलाने केली आहे.

अक्षयने 500 रुपये मागितले-

एवढंच नाही तर समोर आलेल्या माहितीनूसार एन्काऊंवर दिवशी अक्षयने त्याच्या कुटुंबासोबत संवाद साधला होता. बनावट चकमकीच्या अवघ्या काही तासांपूर्वी अक्षयचे आईवडील अक्षयला भेटले होते. त्याच्या देहबोलीवरून तो पळून जाण्याचा विचार करत असल्याचे दिसून आले नाही. त्याने आपल्या आई-वडिलांकडे 500 रुपये मागितले होते. कँटिनमध्ये हवे ते खाण्याची सुविधा मिळावी म्हणून त्याने आईवडिलांकडून पैसे घेतले होते, असं वकील कटारनवरे यांनी कोर्टाला सांगितलं.

News Title : akshay shinde encounter case advocate makes a blast

महत्त्वाच्या बातम्या-

अरबाज पटेल पुन्हा बिग बॉसमध्ये झळकणार?

अक्षयने पिस्तुल लोड कशी केली? मोठा प्रश्न उपस्थित

पुणेकरांनो पाणी जपून वापरा; उद्या ‘या’ भागातील पाणीपुरवठा बंद राहणार

गायिका नेहा कक्करचं लग्न मोडणार?, रोहनप्रीत सिंहपासून घेणार घटस्फोट?

‘या’ बड्या बँकेत झाला कोट्यवधीचा घोटाळा, तुमचं खातं तर नाही ना?

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now