एन्काऊंटरमध्ये आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू, आरोपीबद्दल मोठी माहिती समोर!

On: September 23, 2024 7:48 PM
akshay-shinde
---Advertisement---

Akshay Shinde | बदलापूरच्या नामांकीत शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळं सर्वत्र खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखला करत आरोपी अक्षय शिंदेला अटक केली. दरम्यान, आता अक्षय शिंदेबद्दल सर्वात मोठी माहिती समोर आली आहे.

पोलिसांकडून एन्काऊंटर-

अक्षय शिंदेला (Akshay Shinde) बदलापूर येथे घेऊन जात असताना, अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकावून पोलिसांच्या पायावर गोळी झाडली. या वेळी पोलिसांनी सेल्फ डिफेन्ससाठी अक्षयवर गोळ्या झाडल्याचं समोर आलं आहे. बदलापूरच्या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे, असं असतानाच आता बदलापूरातील शाळेत लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान ट्रान्झिट रिमांडसाठी  घेऊन जात असताना अक्षय शिंदेंने पोलीसांची बंदूक हिसकावून स्वत:वर गोळी झाडली आहे.

अक्षय शिंदेचा मृत्यू-

अक्षय शिंदेला (Akshay Shinde) ट्रान्झिट रिमांडसाठी बदलापूरला घेऊन जात असताना अक्षयने पोलिसांवर गोळीबार करत स्वतःवर गोळी झाडून घेतली. दरम्यान, अक्षयला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं यावेळी त्याचा मृत्यू झाला आहे. स्वतःवर तीन राऊंड फायर झाल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये अक्षय गंभीर जखमी झाला.

News Title : akshay shinde encounter by mumbai police

महत्त्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून एनकाऊंटर?

सर्वात मोठी बातमी! बदलापूर प्रकरणातील आरोपीने स्वत:वरच झाडून घेतली गोळी

कुणबीच्या तीन पोटजातींचा OBC मध्ये समावेश; मंत्रिमंडळाने घेतले 24 मोठे निर्णय

PM किसान योजनेचा 18 वा हप्ता कधी जमा होणार? महत्वाची माहिती समोर

नवऱ्याचा लटकलेला मृतदेह, पत्नीची खाली हळदी-कुंकवाने पूजाअर्चा; इथं घडली धक्कादायक घटना

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now