अक्षयच्या मृतदेहाचे दहन नव्हे तर दफन होणार, पण अंत्यसंस्कारासाठी जागा मिळेना

On: September 26, 2024 10:58 AM
Akshay Shinde Encounter
---Advertisement---

Akshay Shinde Encounter l बदलापूर येथील शाळेत दोन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली आहे. ही घटना उघडकीस येताच अख्खा महाराष्ट्र हादरला होता. मात्र या घटनेप्रकरणी आरोपी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली होती. मात्र सोमवारी आरोपी अक्षय शिंदेला दुसऱ्या एका केस संदर्भातील चौकशीसाठी तळोजा कारागृह येथून बदलापूरला घेऊन जात असताना पोलीस व्हॅनमध्ये बसलेल्या अक्षयने पोलिसांवर गोळी झाडल्याची घटना घडली होती. मात्र त्यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ म्हणून अक्षयवर गोळीबार केला. या घटनेत अक्षयचा मृत्यू झाला आहे.

मृतदेहावर अद्यापही अंत्यसंस्कार नाही :

अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरमुळे सध्या बराच गदारोळ सुरू झाला असून हा एकप्रकारे फेक एन्काऊंटर असल्याचा दावा करत अक्षय शिंदेच्या आई वडिलांनी केला आहे. तसेच अक्षयच्या आई वडिलांनी देखील याप्रकरणी कोर्टात धाव घेतली आहे. त्यामुळे याप्रकरणी सध्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

दरम्यान या घटनेला आता तब्बल 4 दिवस उलटून गेले आहेत. मात्र तरी देखील अक्षय शिंदेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले नाहीत. मात्र आता मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागेचा शोध सुरू आहे. तसेच हायकोर्टाने सरकारला सूचना दिल्यानंतर पोलिसांची स्थानिक प्रशासनासोबत देखील चर्चा सुरू आहे. याशिवाय मृत अक्षयच्या कुटुंबियांकडून अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Akshay Shinde Encounter l अक्षयच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागेचा शोध सुरू :

बदलापूर अत्याचारात प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरची हायकोर्टात सुनावणी काळ पार पडली आहे. त्यादरम्यान न्यायाधीशांनी देखील पोलिसांच्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच प्राथमिकदृष्ट्या हा एन्काऊंटर वाटतच नसल्याचं नाययमूर्तींनी म्हंटल आहे, याशिवाय एन्काऊंटरची व्याख्या ही पूर्णपणे वेगळी असते असा स्पष्ट निष्कर्ष न्यायालयाने सुनावणी दरम्यान नमूद केला आहे. तसेच या एन्काऊंटर यासंदर्भात अनेक प्रश्नांची उत्तरं हायकोर्टाने पोलिसांकडून मागण्यात आली आहेत.

मात्र अद्यापही अक्षयच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागेचा शोध सुरू आहे. तसेच आम्हाला आमच्या मुलाचा म्हणजेच अक्षयचा मृतदेह दफन करायचा आहे अशी भूमिका त्याच्या कुटुंबियांनी घेतली आहे. मात्र त्यासाठी देखील जागा उपलब्ध होत नसल्याचे दिसून येत आहे.

News Title – Akshay Shinde Encounter News

महत्वाच्या बातम्या- 

पुण्यात आज PM मोदींचा दौरा, वाहतुकीत झाले मोठे बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग

अहमदनगरमध्ये भाजपला मोठा धक्का, बडा नेता शरद पवार गटाच्या मार्गावर?

आज जुळून आला गुरु पुष्य योग; ‘या’ 5 राशींचं भाग्य उजळणार!

मुंबई पुन्हा तुंबली! मुसळधार पावसाने लोकल सेवा मंदावली, जनजीवनही विस्कळीत

राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ, ‘या’ जिल्ह्यांतील शाळांना आज सुट्टी जाहीर

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now