Akshay Shinde Encounter l बदलापूर येथील शाळेत झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय चीनदेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मात्र या घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अशातच आज या प्रकरणातील मृत आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटर प्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी देखील पार पडली आहे. या सुनावणी दरम्यान न्यायमूर्तींनी पोलिसांना भरपूर प्रश्न विचारले आहेत.
बलात्कार प्रकरणातील सुनावणीत काय घडलं? :
याप्रकरणी सुनावणी दरम्यान मृत आरोपी अक्षय शिंदेला तुरुंगातून बाहेर काढल्यानंतर आणि त्याला पोलीस व्हॅनमध्ये बसवेपर्यंत तसेच एन्काऊंटर झाल्यानंतर शिवाजी रुग्णालयात नेईपर्यंतच्या सर्व घटनाक्रमाचे व्हिडीओ फुटेज देखील उच्च न्यायालयाने सादर करण्यास पोलिसांना सांगितले आहेत. तसेच याप्रकरणी न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली आहे.
याशिवाय मृत आरोपी अक्षय शिंदेने पोलीस वाहनात देखील पोलिसांच्या हातातील बंदूक हिसकावून घेऊन त्याने पोलिसांवर गोळीबार केला असल्याचा असा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहे. तसेच याप्रकरणावर न्यायमूर्तींनी देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
Akshay Shinde Encounter l बंदूक आधीच लोड कशी काय होती? :
बलात्कार प्रकरणातील मृत आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांवर गोळीबार केल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहे. मात्र आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांची पिस्तुल कशी हिसकावली. तसेच ती बंदूक आधीच लोड कशी काय होती? यावर आमचा विश्वास बसत नसल्याचं नाययमूर्तींनी म्हंटल आहे.
याशिवाय कोणताही सामान्य माणूस पोलिसांची पिस्तुल हिसकावून गोळी झाडू शकत नाही. तसेच कोणताही कमजोर माणूस पिस्तुल लोड देखील करू शकत नाही. तसेच तुम्हाला पिस्तुल वापरता येते का? मी 100 वेळा तरी वापरली आहे, त्यामुळे मी हे सांगू शकतो अशा शब्दात न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारी वकिलांना आणि पोलिसांना थेट सुनावल आहे.
News Title : Akshay Shinde Encounter
महत्वाच्या बातम्या-
पुणेकरांनो पाणी जपून वापरा; उद्या ‘या’ भागातील पाणीपुरवठा बंद राहणार
गायिका नेहा कक्करचं लग्न मोडणार?, रोहनप्रीत सिंहपासून घेणार घटस्फोट?
‘या’ बड्या बँकेत झाला कोट्यवधीचा घोटाळा, तुमचं खातं तर नाही ना?






