Akshay Kumar | बॉलिवूडमधील सर्वाधिक मेहनती आणि यशस्वी अभिनेत्यांपैकी एक म्हणजे अक्षय कुमार (Akshay Kumar). अॅक्शन हिरो म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या अक्षयने रोमँटिक, कॉमेडी आणि सामाजिक विषयांवरील चित्रपटांमध्येही आपला ठसा उमटवला आहे.
2001 मध्ये त्याने ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) सोबत विवाह केला, मात्र त्याआधी त्याचं नाव अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलं होतं. यातीलच एक प्रमुख नाव म्हणजे शीबा आकाशदीप (Sheeba Akashdeep).
अक्षय कुमारच्या नात्याची सुरुवात-
1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मिस्टर बॉण्ड’ (Mr. Bond) चित्रपटाच्या सेटवर अक्षय (Akshay Kumar) आणि शीबामध्ये जवळीक निर्माण झाली. दोघांनाही फिटनेसची प्रचंड आवड होती, त्यामुळे त्यांच्यात चांगली मैत्री झाली. इतकंच नाही, तर त्यांच्या कुटुंबांमध्येही चांगले संबंध होते. शीबाच्या आजी आणि अक्षयच्या (Akshay Kumar) आई ताश खेळत असत, त्यामुळे दोन्ही घराण्यांमध्ये देखील मैत्री होती.
View this post on Instagram
शीबाने नात्याबद्दल काय सांगितलं?
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शीबाने त्यांच्या नात्याचा खुलासा केला. ती म्हणाली, “त्या वेळी आम्ही दोघेही खूप लहान होतो. जेव्हा तुम्ही तरुण असता आणि एकत्र काम करता, तेव्हा असे घडते. पण नंतर आमचे मार्ग वेगळे झाले, आणि आम्ही मित्र म्हणूनही राहू शकलो नाही.”
शीबा पुढे म्हणाली, “तरुण वयात नाती फार भावनिक असतात. प्रेमात एक वेगळी ताकद असते, जी कधी भावनिक बनवते, तर कधी रागीट. अशा वेळी मैत्री टिकवणं कठीण जातं. काही नाती कायम टिकत नाहीत, पण त्याची आठवण नेहमी राहते.”
अक्षय कुमारचा चित्रपट प्रवास-
अक्षय कुमारने (Akshay Kumar) आपल्या करिअरमध्ये विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. 90च्या दशकात ‘खतरों का खिलाडी’ म्हणून त्याने अॅक्शन चित्रपटांत नाव कमावलं. ‘हेरा फेरी’, ‘गरम मसाला’ यांसारख्या कॉमेडी चित्रपटांमध्ये त्याने आपल्या अभिनयाने लोकांना हसवलं.
‘टॉयलेट: एक प्रेम कथा’, ‘पॅडमॅन’, ‘केसरी’ सारख्या सामाजिक विषयांवरील चित्रपटांतून समाजाला संदेश दिला. आजही अक्षय कुमार हा बॉलिवूडमधील सर्वाधिक यशस्वी आणि मेहनती अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. त्याने आपल्या संघर्षातून यश मिळवलं असून तो सतत नवनवीन भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.






