लग्नाच्या 24 वर्षांनी अक्षय कुमारचा पत्नी ट्विंकलबद्दल धक्कादायक खुलासा!

On: August 12, 2024 3:57 PM
Akshay Kumar big revelation about marriage
---Advertisement---

Akshay Kumar | बॉलिवूडचा खिलाडी कुमार अशी ओळख असणारा अभिनेता अक्षय कुमार हा सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ‘खेल खेल में’ हा त्याचा चित्रपट या गुरुवारी रिलीज होणार आहे. अक्षयचा या वर्षीचा हा तिसरा चित्रपट आहे. चित्रपटाच्या रिलीजपुर्वी अक्षयने एका ठिकाणी मुलाखत दिली. यावेळी त्याने(Akshay Kumar) आपल्या लग्नाबाबत मोठा खुलासा केला आहे.

नुकताच अक्षय कुमार हा बिग बॉस मराठी सीजन 5 मध्ये पोहोचला होता. यावेळी घरातील सदस्यांसोबत त्याने खूप मस्ती केली. या मुलाखतीमध्ये त्याने अनेक खुलासे केले. यावेळी अक्षय पत्नी ट्विंकल खन्ना हिच्याबद्दल बोलताना दिसला. त्याने पर्सनल लाईफमध्ये खुलासा केला.

अक्षय कुमारचा लग्नाबाबत मोठा खुलासा

“मी आणि माझी पत्नी दोघेही एकमेकांपेक्षा खूप जास्त वेगळे आहोत. मी उजवीकडचा विचार करतो आणि ती डावीकडचा. पण, आमच्यात अशी गोष्टी आहे, जी एकसारखी आहे…दोघांना पण रात्री लवकर झोपायला आवडते आणि सकाळी लवकर उठायला.”, असं अक्षय म्हणाला.

तसंच आम्हाला लूडो आणि काही गेम खेळायला देखील आवडतात. याशिवाय आमच्यामध्ये एकही गोष्ट सारखी नाहीये. परंतू, नात्यामध्ये या गोष्टी फार महत्वाच्या ठरत नाहीत. तुमच्या जोडीदारासोबतचे 36 पैकी 35 जरी गुण नाही मिळाले तरीही चालतात. फक्त एकच गुण जुळायला पाहिजे तो 1 गुण म्हणजे दोघांनीही एकमेकांचा सन्मान करणे, असं अक्षय (Akshay Kumar) म्हणाला.

“ट्विंकल आणि माझ्यात काहीही सारखं..”

आपल्या जोडीदाराचा सन्मान करायला हवा, हा एक गुण 36 गुणांची बरोबरी करतो, असं अक्षय कुमार म्हणाला. त्याची ही मुलाखत आता चर्चेत आली आहे. अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांनी 2001 मध्ये लग्न केले. ट्विंकल खन्ना हिच्यासोबत लग्न करण्याच्या अगोदर अभिनेता हा शिल्पा शेट्टी हिला डेट करत होता.

त्याकाळी अक्षय (Akshay Kumar) आणि शिल्पा शेट्टी यांच्या डेटिंगच्या खूप जास्त चर्चा रंगल्या होत्या. इतकंच काय तर, दोघेही लवकरच लग्न करणार असल्याचं देखील म्हटलं गेलं. मात्र, अक्षयने ट्विंकल खन्ना हिच्यासोबत लग्न केलं. दोघांच्या लग्नाला आता जवळपास 24 वर्षे होत आहेत. दोघेही सुखी संसार करत आहेत.

News Title :  Akshay Kumar big revelation about marriage

महत्त्वाच्या बातम्या-

गडकरींच्या बालेकिल्ल्यातच मनसेचा राडा; आता थेट टोलनाकाच फोडला

शेअर बाजारातील मोठ्या घडामोडीनंतर सोन्याचे दर काय?

सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं; ऐन श्रावणात भाज्यांचे दर भिडले गगनाला

“राहुल गांधी अत्यंत खतरनाक, विध्वंसक असून ते कधीच पंतप्रधान..”; कंगना रनौतचा संताप

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! अर्ज करण्यासाठी ‘या’ लिंकवर क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now