Akshay Jawalkar & Mohini Wagh l पुण्यातील हॉटेल व्यावसायिक सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. भाजपचे विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा असलेले सतीश वाघ यांची हत्या त्यांच्या पत्नीनेच प्रेम प्रकरणामुळे करण्यात आल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.
अक्षय जावळकर आणि मोहिनीची ओळख कशी झाली? :
अक्षय जावळकर आणि मोहिनी वाघ यांची ओळख 2001 मध्ये झाली होती. अक्षयचे आई-वडील फुरसुंगीतील खोलीत भाड्याने राहायला आले होते. अक्षयचे वय तेव्हा फक्त 9 वर्षांचे होते, तर सतीश आणि मोहिनी वाघ यांचा मुलगा त्याच वयाचा असल्याने दोघांमध्ये मैत्री झाली. 2013 मध्ये अक्षय 21 वर्षांचा झाला तेव्हा त्याचे आणि त्यावेळी 37 वर्षांच्या असलेल्या मोहिनी वाघ यांच्यासोबत अनैतिक संबंध निर्माण झाले.
सतीश वाघ यांना 2016 मध्ये त्यांच्या पत्नी मोहिनी आणि अक्षय जावळकर यांच्यातील अनैतिक संबंधांबद्दल कुणकुण लागली होती. यामुळे त्यांच्यातील वाद वाढत गेले आणि मोहिनी वाघ यांनी सतीश वाघ यांचा काटा काढायचं ठरवलं. मोहिनी वाघने 5 लाख रुपयांची सुपारी देऊन सतीश वाघ यांची हत्या करण्याचा कट रचला. अक्षय जावळकरच्या मदतीने त्यांनी ही हत्या घडवून आणली.
Akshay Jawalkar & Mohini Wagh l मोहिनी वाघ अन् अक्षयच्या कॉल रेकॉर्डमधून झाला उलगडा :
पोलिसांनी मोहिनी वाघ आणि अक्षय जावळकर यांच्या कॉल रेकॉर्ड्स तपासल्यानंतर हत्येचा उलगडा झाला. पोलिसांनी त्यांच्या पार्श्वभूमीचा तपास केला आणि दोघांच्या संबंधांची पूर्ण माहिती मिळवली. यामुळे मोहिनी वाघ आणि अक्षय जावळकर यांना अटक करण्यात आली आहे.
तसेच या घटनेप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. यामध्ये अक्षय जावळकर, पवन शर्मा, नवनाथ गुरसाले आणि विकास शिंदे यांचा समावेश होता.
News Title : Akshay Jawalkar & Mohini Wagh Reletion
महत्वाच्या बातम्या –
अखेर सतीश वाघ हत्येमागचा मास्टरमाइंड समोर! …अत्यंत जवळच्या व्यक्तीनेचं काढला काटा
संतोष देशमुख प्रकरणी सुरेश धसांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट!
पुण्यातील ‘या’ भागात मद्यधुंद कारचालकाचा हैदोस! तब्बल ‘इतक्या’ वाहनांना दिली धडक
सिनेमालाही लाजवेल असं हत्याकांड, सतीश वाघ हत्याप्रकरणी पोलिसांचा मोठा खुलासा






