Pooja Khedkar Case | बोगस आयएएस म्हणून चर्चेत आलेल्या पूजा खेडकर यांच्या कुटुंबाचे नवे वादग्रस्त प्रकरण समोर आले आहे. नवी मुंबईतील रबाळे परिसरातून अपहरण झालेला ट्रक हेल्पर थेट खेडकर कुटुंबाच्या पुण्यातील बंगल्यात सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे खेडकर कुटुंबियांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडला आहे.
अपघात आणि अपहरणाची घटना :
शनिवारी सायंकाळी मुलुंड–ऐरोली मार्गावर सिमेंट मिक्सर ट्रक आणि MH 12 RP 5000 या कारचा अपघात झाला. ट्रकमध्ये चालक चंदकुमार चव्हाण आणि हेल्पर प्रल्हाद कुमार होते, तर कारमध्ये दोन अज्ञात व्यक्ती होते. अपघातानंतर वाद झाल्यावर कारमधील व्यक्तींनी हेल्पर प्रल्हाद कुमारला जबरदस्तीने कारमध्ये बसवून नेले. काही अंतरानंतर कार गायब झाली. (Pooja Khedkar Case)
ट्रक चालकाने मालक विलास ढेंगरे यांना माहिती दिली आणि लगेचच नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली.
Pooja Khedkar Case | पोलिस तपास आणि धक्कादायक उलगडा :
तक्रारीनंतर पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. तपासादरम्यान अपघातातील MH 12 RP 5000 क्रमांकाची कार पुण्यातील पूजा खेडकर यांच्या बंगल्यात आढळली. नवी मुंबई पोलिसांचे पथक तातडीने पुण्यात दाखल झाले.
पोलीस घराजवळ पोहोचल्यावर खेडकर यांच्या आईने गेट उघडण्यास नकार दिला, मात्र पोलिसांनी कसून चौकशी सुरू ठेवली. अखेरीस घरातून हेल्पर प्रल्हाद कुमार याची सुटका करण्यात आली.






