Ambani Net Worth | देशातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अंबानी कुटुंबाचे नाव अग्रक्रमावर असतेच, मात्र आता मुकेश अंबानी यांचे दोन पुत्र आकाश अंबानी (Akash ambani) आणि अनंत अंबानी (Anant ambani) देशातील सर्वात श्रीमंत तरुणांच्या यादीतही सामील झाले आहेत. 360 वन वेल्थ आणि क्रिसिल या संस्थांनी तयार केलेल्या अहवालात त्यांचा समावेश झाला असून, त्यांच्या एकत्रित संपत्तीची आकडेवारी चकित करणारी आहे.
या अहवालानुसार, आकाश आणि अनंत अंबानी यांची मिळून एकूण संपत्ती सुमारे 3.59 लाख कोटी रुपये इतकी आहे. यादीत देशभरातील 2013 श्रीमंत व्यक्तींचा समावेश आहे, ज्यांनी 500 कोटींपेक्षा जास्त संपत्ती निर्माण केली आहे. यातील बहुतेक जण हे व्यावसायिक, स्टार्टअप संस्थापक, गुंतवणूकदार आणि वारसदार आहेत. (Ambani Net Worth)
मुंबई ठरलं ‘श्रीमंतीचं राजधानी’; फार्मा क्षेत्रात सर्वाधिक श्रीमंत :
या यादीत मुंबईने सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या संख्येत बाजी मारली असून, येथील एकूण 577 व्यक्ती श्रीमंतांच्या यादीत आहेत. दिल्ली दुसऱ्या स्थानावर असून त्यानंतर बेंगळुरू, अहमदाबाद आणि हैदराबादचा क्रम लागतो. यादीतील एकूण संपत्तीच्या 40% हिस्सा एकट्या मुंबईच्या उद्योजकांकडे आहे.
या यादीत 40 वर्षांखालील 143 तरुण उद्योजक आहेत, ज्यांनी मेहनतीने वैयक्तिक संपत्ती कमावली आहे. त्यात डिजिटल स्टार्टअप, फिनटेक, IT आणि ई-कॉमर्ससारख्या क्षेत्रातील उद्योजकांचा मोठा सहभाग आहे. यातील भारतपेचे शश्वत नकरानी केवळ 27 वर्षांचा असून देशातील सर्वात श्रीमंत तरुण ठरला आहे.
Ambani Net Worth | कोट्यवधींच्या यादीत कोण कुठे? आणि महिलांचा भरीव वाटा :
या यादीत 161 जणांकडे 10,000 कोटींपेक्षा जास्त संपत्ती आहे, तर 169 व्यक्तींकडे 5,000 ते 10,000 कोटी दरम्यान संपत्ती आहे. एकूण संपत्तीपैकी 24% वाटा केवळ रिलायन्स, टाटा आणि अदानी समूहाच्या कुटुंबांजवळ आहे. सर्वाधिक वैयक्तिक श्रीमंती बँकिंग, टेलिकॉम, एव्हिएशन आणि औषधनिर्मिती क्षेत्रातून आली आहे. (Ambani Net Worth)
महिलांच्या बाबतीतही यंदाचा आकडा उत्साहवर्धक आहे. एकूण संपत्तीपैकी 24% हिस्सा महिलांचा असून फार्मा क्षेत्रात महिलांचा वाटा तब्बल 33% आहे. या यादीत 72 महिला आहेत, ज्यांनी स्वतः व्यवसाय सुरू केलेत किंवा मोठं मूल्य निर्माण केलं आहे. यातील 21 महिला पहिल्या पिढीतील उद्योजिका आहेत.






