हार्दिकच्या चुकीच्या निर्णयामुळे मुंबईचा पराभव, आकाश अंबानी संतापला

On: April 5, 2025 9:34 AM
Mumbai Indians
---Advertisement---

Mumbai Indians l आयपीएल 2025 च्या एका रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्सला लखनौ सुपर जायंट्सकडून पराभव स्वीकारावा लागला. सामना अंतिम टप्प्यात पोहोचला असताना हार्दिक पांड्याने घेतलेल्या निर्णयामुळे प्रेक्षक आणि टीम मालक आकाश अंबानी (Akash Ambani) यांचाही संताप उफाळून आला.

हार्दिकचा तिसऱ्या चेंडूवरील निर्णय वादग्रस्त ठरला :

लखनौ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्ससमोर 203 धावांचं आव्हान ठेवलं होतं. प्रत्युत्तरात मुंबईने 20 षटकांत 5 गडी गमावत 191 धावा केल्या. सामना निर्णायक टप्प्यात असताना शेवटच्या दोन षटकांत 29 धावांची गरज होती. 19 वं षटक शार्दुल ठाकुरने अफलातून टाकले आणि या षटकात सेट फलंदाज तिलक वर्मा रिटायर झाला. त्या आधीच्या चेंडूंवर हार्दिक आणि तिलकने एकेका धावा घेत स्ट्राईक अदलाबदल केली होती.

19 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर सँटनर मैदानात आला आणि दोन धावा घेत हार्दिकला पुन्हा स्ट्राईक दिला. मात्र, पुढच्या षटकात जे घडलं त्याने चाहत्यांना आणि टीम मॅनेजमेंटला धक्का दिला. पहिल्या चेंडूवर हार्दिकने षटकार ठोकून सामना मुंबईच्या बाजूने वळवला, पण तिसऱ्या चेंडूवर तो धाव न घेता सँटनरला परत पाठवतो, हे अनेकांच्या आकलनाच्या बाहेर गेले.

Mumbai Indians l आकाश अंबानीची प्रतिक्रिया ठरली चर्चेचा विषय :

सामन्याच्या अंतिम क्षणी 4 चेंडूत 14 धावांची गरज असताना हार्दिककडून स्ट्राईक कायम ठेवण्याचा निर्णय घेतला गेला. तिसऱ्या चेंडूवर धाव न घेता सँटनरला स्ट्राईक न देण्याचा निर्णय पाहून आकाश अंबानी चिडलेले दिसले. मैदानावरील त्यांची प्रतिक्रिया कॅमेऱ्यात टिपली गेली आणि सोशल मीडियावर लगेच व्हायरल झाली.

चौथ्या चेंडूवर पुन्हा काही धाव न घेता वेळ वाया गेला. पाचव्या चेंडूवर हार्दिकने फक्त एक धाव घेतली आणि शेवटच्या चेंडूवर सँटनर काही करू शकला नाही. परिणामी मुंबई 12 धावांनी सामना गमावली. हा निर्णय आणि त्यामागील विचार प्रक्रियेवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. सामना जिंकण्याच्या स्थितीत असतानाही हरावे लागल्याने टीम मॅनेजमेंट नाराज झालं असून, पुढील सामन्यांसाठी नव्याने रणनीती आखण्याची शक्यता आहे.

News Title: Akash Ambani Furious Over Hardik’s IPL Decision

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now