‘मी तर घेणारे शपथ, मी काय थांबणार नाही’; अजित पवारांच्या वक्तव्याने सगळे खळखळून हसले

On: December 4, 2024 4:15 PM
---Advertisement---

मुंबई | अखेर 5 डिसेंबर रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविथी सोहळा पार पडणार आहे. त्याआधी महाराष्ट्रात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडताना दिसत आहेत. आज देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी राजभवनावर जात सत्तास्थापनेचा दावा केला. यानंतर महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली.

पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार हे होते. यावेळी पत्रकारांनी तिघांना अनेक प्रश्न विचारले. यावेळी कोणकोण मंत्री शपथ घेणार? याबाबत पत्रकारांनी तिघांना प्रश्न विचारले. यावर शिंदे उत्तर देत होते. अशात मध्येच अजित पवार पत्रकारांना उत्तर देताना म्हणाले की “मी तर घेणारे शपथ, मी काय थांबणार नाही”

अजित पवारांच्या या वाक्यानंतर तिथे उपस्थित असलेले सगळे खळखळून हसले. तसेच एकनाथ शिंदेंनी यावर उत्तर देताना ‘दादांना सकाळी संध्याकाळी शपथ घ्यायचा अनुभव आहे’, असं म्हणत शिंदेंनी पहाटेच्या शपथविधीची आठवण करून दिली.

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! महायुतीच्या नेत्यांचा राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा

पुन्हा मुख्यमंत्रि‍पदासाठी निवड झाल्यावर देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य!

शपथविधीआधी फडणवीसांचा शिंदेंना धक्का?, ‘त्या’ वक्तव्याने चर्चांना उधाण

“2019 ला बेईमानी झाली, खूप त्रास… “; तिसऱ्यांदा CM होणाऱ्या फडणवीसांच्या मनातील खदखद समोर

ते पुन्हा आले….; देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now