“हा काळ माझाच…”, अजित पवारांच्या ‘या’ एका वाक्याची राजकीय वर्तुळात चर्चा

On: September 27, 2025 3:44 PM
Ajit Pawar
---Advertisement---

Ajit Pawar | बारामती (Baramati) येथे पार पडलेल्या सोमेश्वर कारखान्याच्या (Someshwar Suger Factory) मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी माळेगाव साखर कारखान्यावरून एक मिश्कील टिप्पणी केली. “आम्हाला खाज होती म्हणून माळेगाव कारखान्याचा चेअरमन झालो. आता तिथे सभासद देखील झालो आहे. पण थोड थांबा मी सोमेश्वर कारखान्याकडे पण येणार आहे. ” अशा प्रकारचे वक्तव्य केले, त्यामुळे मेळाव्यात उपस्थित व्यक्तींच्या आश्चर्याने भुवया उंचावल्या. पण थोड्याच वेळात मी गंमत केली म्हणत त्यांनी उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या.

‘आम्हाला खाज होती म्हणून माळेगाव कारखान्याचा चेअरमन…’ अजित पवार:

दरम्यान, २६ सप्टेंबरला बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या आवारात शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला. त्यावेळी त्यांनी मेळाव्यास संबोधित केले.

मेळाव्यात बोलताना त्यांनी माळेगाव आणि सोमेश्वर कारखान्यांबद्दल उल्लेख केला. ते म्हणाले ” उसाला राज्यात सर्वाधिक भाव देणारा सोमेश्वर कारखाना आहे. आम्हाला खाज होती म्हणून माळेगावचा चेअरमन झालो.. पण तिथे आता सभासद देखील झालो आहे. थोडे थांबा सोमेश्वरला देखील मी सभासद होणार आहे. अन् एकदाच सगळे रेकॉर्डच करून टाकतो. सगळ्याच कारखान्याचा चेअरमन अजित पवार “, असे म्हणाले.

Ajit Pawar | … तर अनेकांना झोपा यायच्या नाहीत :

पुढे बोलताना “मी गंमत केली, असे म्हणाले, तर अनेकांना झोपा यायच्या नाहीत. एक तर अगोदरच चेअरमन पदासाठी बाशिंग लावून बसलेले अनेक जण आहेत. त्यांना असं वाटतं की कधी माझे नाव लग्नपत्रिकेवर प्रेक्षक म्हणून चेअरमन या नावाखाली प्रसिद्ध होईल. त्यामुळे मी सोमेश्वर सहकारी कारखान्याचा चेअरमन होणार नाही. काळजी करू नका !”, असे अजित पवार म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकाला.

काही दिवसांपूर्वी माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत त्यांनी चंद्रराव तावरे आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पॅनलचा पराभव करत ते चेअरमन (Chairman) झाले होते.

शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना मारले टोले :

गेल्या काही दिवासांपासून अजित पवार (Ajit Pawar) ज्येष्ठ नेते व त्यांचे काका शरद पवार (Sharad Pawar) आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना टोले मारत आहेत. यावेळीही अजित पवारांनी शरद पवार (Ajit Pawar) आणि खासदार सुप्रिया सुळे यांना टोले मारायची संधी सोडली नाही.

बारामतीतील तिरंगा चौकाच्या संदर्भाने त्यांनी सुळे यांच्यावर टीका केली, तर “मी २५ ते ५० वर्षांचे नियोजन करून काम करतो. टीका झाली तरी नंतर माझे काम योग्यच असल्याचे सिद्ध होते” असे म्हणत शरद पवारांना अप्रत्यक्षरित्या लक्ष्य केले.

पुढे सभेत उपस्थित असलेल्या एका कार्यकर्त्याकडे पाहत ते म्हणाले, “बुवा घड्याळावर सगळे उमेदवार उभे करणार आहे. पण तुम्ही माझ्यासोबत राहा. हा काळ माझा आहे. प्रत्येकाचा काळ असतो, आत्ता माझा आहे, पुढे संपेल. पण सध्या तरी माझ्या सोबत राहा,” असे आवाहन करत त्यांनी कार्यकर्त्यांची दाद मिळवली.

News Title: Ajit Pawar’s  remark at Someshwar Sugar Factory; tells party workers, ‘This is my Time’.

Join WhatsApp Group

Join Now