‘नारायण राणे यांना बाईने…’; अजित पवार यांचे राणेंना टोले, राऊत म्हणाले ‘कमाल दादा’

On: February 24, 2023 5:07 PM
---Advertisement---

मुंबई | विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर आपल्या खास शैलीत टीका केली. त्यामुळे राऊत यांनी अजित पवार यांचा हा व्हिडीओ शेअर करत त्यांची स्तुती केली आहे.

दादा म्हणजे कमाल आहे. कमाल की चीज… असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. संजय राऊत यांनी अजित पवार यांचा व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओत अजित पवार भाषण करताना दिसत आहेत.

नारायण राणे यांनी शिवसेना फोडली. सर्व पडले की नाही? राणे साहेब तर दोनदा पडले. एकदा कोकणात पडले. दुसऱ्यांदा वांद्रे की कुठे तरी पाडले. हां… तिथे पडले. तिथे तर महिलेने पाडलं… हां… बाईनं पाडलं… बाईनं… ही त्यांची… प्रत्येकाची काय परिस्थिती आहे…, असं अजित पवार बोलताना दिसत आहेत.

राज्यात निर्माण झालेल्या कटुतेवर राऊत यांनी पुन्हा एकदा भाष्य केलं. देवेंद्र फडणवीस यांनी काही महिन्यांपूर्वी विधान केलं होतं. कटुता वाढली, असं फडणवीस म्हणाले होते. कटुता संपली पाहिजे, असंही ते म्हणाले होते. मी म्हटलं होतं तुम्ही पुढाकार घ्या, असं राऊत म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now