Rupali Chakankar Vs Anjali Damania | राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या शिक्षणावरून सध्या सोशल मीडियावर नवा वाद पेटला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी अजित पवार (AJit Pawar) यांच्यावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर, अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी भावनिक पोस्ट करत त्यांना पाठिंबा दिला.
दमानिया यांनी विचारलेल्या प्रश्नाला रूपाली चाकणकरांनी भावनिक शब्दांत उत्तर दिलं आणि अजित दादांचा मानवी आणि अभ्यासू पैलू मांडला. मात्र या प्रत्युत्तरावर पुन्हा एकदा अंजली दमानिया यांनी रिपोस्ट करत कडक प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे अजित पवारांच्या शिक्षण आणि अर्थकारणावरील चर्चेला आता जोर चढला आहे.
रूपाली चाकणकरांचा भावनिक बचाव :
रूपाली चाकणकर म्हणाल्या, “आदरणीय अजितदादांच्या वडिलांचं हृदयविकाराने निधन झालं तेव्हा ते कोल्हापुरात शिक्षण घेत होते. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी शिक्षण अर्धवट सोडलं आणि बारामतीला परत येऊन शेती आणि पोल्ट्री व्यवसाय सुरू केला.”
त्यानंतर त्यांनी शेतीचा विकास करत करत राजकारणात प्रवेश केला आणि आज उपमुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचले. चाकणकर पुढे म्हणाल्या, “अजितदादा गणितात अतिशय हुशार आहेत. इमारती, पूल, रस्त्यांच्या बाबतीत त्यांचा दृष्टिकोन इंजिनियरलाही लाजवेल असा आहे. ते कृषी आणि शिक्षण क्षेत्रात एआयचा वापर करण्यावर भर देतात.”
Rupali Chakankar Vs Anjali Damania | अंजली दमानियांचा कडक प्रश्न – “ब्ल्यू प्रिंट आहे का?” :
रूपाली चाकणकरांच्या (Rupali Chakankar) पोस्टनंतर अंजली दमानिया यांनी पुन्हा रिपोस्ट करत टीका केली. त्या म्हणाल्या, “राज्याचे अर्थमंत्री दहावी पास आहेत, त्यांना अर्थकारण खरंच कळतं का?” त्यांनी पुढे म्हटलं की, “अर्थ मंत्रालय हा अत्यंत गंभीर विषय आहे. यात असलेले आकडे, कर्ज आणि आर्थिक बाबी समजण्यासाठी अर्थशास्त्राचं ज्ञान आवश्यक आहे.”
दमानिया यांनी आपल्या पोस्टमध्ये महाराष्ट्र आणि स्वित्झर्लंडच्या अर्थव्यवस्थेची तुलना करत लिहिलं की, “स्वित्झर्लंडचा जीडीपी 83 लाख कोटी आहे, तर महाराष्ट्राचा 42 लाख कोटी. महाराष्ट्राचं कर्ज 9 लाख कोटींवर गेलं आहे, हे कसं कमी करणार? काही ब्ल्यू प्रिंट आहे का?” त्यांच्या या प्रश्नानंतर सोशल मीडियावर चर्चा तापली आहे.






