“अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील”

On: October 5, 2023 11:27 AM
---Advertisement---

मुंबई | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेच सध्या मुख्यमंत्री राहतील. अजित पवार (Ajit Pawar) यांना मुख्यमंत्री करण्याची वेळ आली तर त्यांना पाच वर्षासाठी मुख्यमंत्री करू, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यामुळे अजित पवार (Ajit Pawar) हे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजितदादा पुढच्या टर्ममध्ये मुख्यमंत्री होणार आहे काय? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर तसं काही नाही. केव्हाही होतील. राजकारण काही सांगून येत नाही. राजकारणात कधी काय घडेल सांगता येत नाही, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं आहे.

पुढच्या निवडणुकीनंतर किंवा त्यापूर्वीही दादा मुख्यमंत्री होऊ शकतात. दादा मुख्यमंत्री व्हावेत म्हणून जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी माझ्यावर सोपवली. हे आधीपासून ठरलं होतं. खासदार प्रफुल्ल पटेल यांचा हा जिल्हा आहे. त्यामुळे मोठी जबाबदारी आहे. पालकमंत्री म्हणून काम करताना गोंदिया जिल्ह्यात पक्ष मजबूत करणे आणि राष्ट्रवादीची ताकद वाढवण्यावर आमचा भर राहील, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now