पुणे | महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) कायम कोणत्या न कोणत्या कारणावरुन चर्चेत असतात. मध्यंतरी अजितदादा नाराज असल्याच्या चर्चा होत्या. मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी अजितदादांची तब्येत ठीक नाही असं कारण सांगत चर्चांना पुर्णविराम दिला. दरम्यान पुन्हा एकदा अजितदादा नाराज असल्याच्या चर्चा सुुरु आहेत.
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री (Guardian Minister) म्हणून अजितदादांची निवड करण्यात आली. अगदी पद हातात आल्यापासून दादा आपली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडत आहेत. त्यांनी बैठकांचा धडाका लावला आहे. तसेच सकाळी सहा वाजताच विकास कामांची पाहणी ते करताना दिसतात. पुणे जिल्हा परिषदेचा आढावा घेत असताना त्यांनी तेथील कारभारावर नाराजी व्यक्त केली.
काही अधिकाऱ्यांना अजितदादांनी दम देत कारभारात सुधारणा करण्याचे आदेश दिले. पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या कारभारावर अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी जिल्हा परिषद आधिकाऱ्यांसोबत बैठक घेत काही गोष्टींचा आढावा घेतला
बैठकीत बोलत असताना शिक्षण विभागाच्या कारभारावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, की शाळांच्या मान्यतेच्या फाईली ‘वजन’ ठेवल्याशिवाय मंजूर होत नाही. यासंदर्भात शाळांनी शिक्षण विभागाशी संपर्क साधल्यावर प्रस्तावात काहीतरी त्रुटी काढल्या जातात. शिक्षण विभागात सुरु असलेला हा गैरकारभार वेळीच सुधारा, अन्यथा कारवाई होईल, या शब्दांत पालकमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दम भरला.
थो़डक्यात बातम्या-






