“काकींना नातवाचा आत्ता एवढा पुळका का..”; अजित पवारांचा प्रतिभाताई पवारांवर निशाणा

On: November 16, 2024 11:53 AM
Ajit Pawar Target Pratibha Pawar
---Advertisement---

Ajit Pawar | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. शेवटच्या तीन दिवसांमध्ये उमेदवारांकडून मतदारसंघ पिंजून काढले जात आहेत. यंदा बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार आहे. युगेंद्र पवार हे थेट अजित पवार यांच्याविरोधात मैदानात उभे राहिले आहेत. शरद पवार यांनी युगेंद्र पवारांसाठी संपूर्ण ताकद लावली आहे. त्यांच्या प्रचारासाठी खुद्द शरद पवार व त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार प्रचारात उतरल्या आहेत. (Ajit Pawar)

आज (16 नोव्हेंबर )सकाळी बारामतीमध्ये प्रचारादरम्यान अजित पवारांनी थेट प्रतिभाताई पवार यांचा उल्लेख करत मोठं वक्तव्य केलं आहे. “मी समोरच्यावर टीका करायला गेलो, तर तो माझा पुतण्या आहेत. मला तो मुलासारखा आहे. पुन्हा आम्हीच आमच्या घरातल्यांवर एकमेकांवर टीका करतोय असं होईल आणि मला हे सगळं करायचं नाहीये. त्यामुळे भावनिक होऊ नका”, असं अजित पवार म्हणाले.

“मी पेताड, गंजेडी असतो तर ठीक आहे, पण..”

पुढे अजित पवार यांनी प्रतिभाताई पवार यांचाही भाषणात उल्लेख केला. “तुम्ही मला 91 पासून आमदार-खासदार केलं. तेव्हापासून प्रतिभाताई कधी बाहेर आल्या आहेत का? आत्ताच का? काय नातवाचा पुळका आलाय माहिती नाही. जर मी खाताडा, पेताडा, गंजाडी असतो तर गोष्ट वेगळी. मी काकींना एकदा निवडणूक झाल्यानंतर विचारणार आहे की काय त्या नातवाचा एवढा पुळका आला होता तुम्हाला? पण आत्ता हे विचारण्याची वेळ नाही”, असा मिश्किल टोला अजित पवार (Ajit Pawar) यांनी लगावलाय.

यावेळी अजित पवारांनी युगेंद्र पवारांना देखील अप्रत्यक्षपणे टार्गेट केलं. पुढे हजारो कोटींची कामं करण्यासाठी नेतृत्वात ताकद असावी लागते. धमक असावी लागते. एखाद्या कामासाठी अधिकाऱ्यांना फोन करावा लागला, तर अधिकाऱ्यांनीही प्रतिसाद दिला पाहिजे. त्यांना तो पोरखेळ वाटता कामा नये. या सगळ्याचा जनतेने विचार करावा, असं म्हणत त्यांनी युगेंद्र पवारांवर निशाणा साधला.

अजित पवार vs युगेंद्र पवार

दरम्यान, अजित पवार आज बारामतीमध्ये गावभेट दौरा करत आहेत. बारामती मधील पानसरे वाडी,जळगाव सुपे, कऱ्हावागज, काऱ्हाटी आणि अंजनगाव या गावांचा अजित पवार (Ajit Pawar) गावभेट दौरा करणार आहेत. यावेळी त्यांनी जनतेला शेतकरी आणि महिलांसाठी त्याचबरोबर इतर योजनांची माहिती दिली.

News Title –  Ajit Pawar Target Pratibha Pawar

महत्त्वाच्या बातम्या-

आनंदवार्ता! सोनं ‘इतक्या’ रुपयांनी झालं स्वस्त; काय आहेत सध्या किंमती?

शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याला मोठा दिलासा; कथित भूखंड घोटाळा केस बंद

“कदाचित उद्या माझा शेवटचा दिवस..”; आमिर खानच्या वक्तव्याने खळबळ

राज ठाकरेंना बालेकिल्ल्यातच धक्का, विश्वासू नेत्याचा उद्धव ठाकरे गटात प्रवेश

रोहित शर्माच्या आयुष्यात ‘ज्युनिअर हिटमॅन’ची एंट्री; पत्नी रितिकाने दिला मुलाला जन्म

Join WhatsApp Group

Join Now