Ajit Pawar l बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. अशातच आता सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने राज्यात मोठी खळबळ उडाली. मात्र आता संतोष देशमुख हत्याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचे नाव सातत्याने चर्चेत आहे. त्यामुळे या घटनेनंतर विरोधक देखील मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले असून मंत्री धनंजय मुंडेंचा वारंवार राजीनामा मागितला जात आहे. अशातच आता याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मौन सोडले आहे.
Ajit Pawar l धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाणार का? :
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाणार का? याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. मात्र त्यावर त्यांनी थेट भाष्य केल आहे. याशिवाय आज या प्रकरणाची न्यायलयाची चौकशी सुरु आहे. तसेच आता या तीन एजन्सी चौकशी करत आहेत, मात्र जो कोणी दोषी असेल ते सिद्ध झालं तर कारवाई करेन आणि चौकशी सुरु आहे.
याशिवाय सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी सापडायला वेळ लागला. तसेच महाराष्ट्रात अजिबात या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत. दरम्यान, याप्रकरणात कोणताही पुरावा नसताना कोणावर आरोप करणं कितपत योग्य आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत.
कराडवर कोणते आरोप आहेत? :
केज तालुक्यातील मस्साजोग येथे पवनचक्कीचे काम करणाऱ्या आवादा कंपनीच्या एका अधिकाऱ्याला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी केज पोलिस ठाण्यात वाल्मिक कराडसह विष्णू चाटे, सुदर्शन घुले या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल आहे.
या प्रकरणाचा तपास सीआयडी पथक करीत आहे. कराड (Walmik Karad) हा पुण्यात शरण आला होता, तर चाटे याला बीड शहराजवळून अटक करण्यात आली होती. सध्या ते पोलिस कोठडीत आहेत.
News Title : Ajit pawar talk about Santosh Deshmukh Murder case on dhananjay munde
महत्वाच्या बातम्या –
पुण्यातील मगरपट्टा ते एफसी रोड, आकाची संपत्ती किती?
वाल्मिक कराडवर ED ची कारवाई का होत नाही? सुप्रिया सुळेंचा सवाल
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची अनोखी प्रेमकहाणी, बायको जापनीज कशी काय?
संतोष देशमुख हत्येप्रकरणी सरपंच परिषद आक्रमक; केल्या ‘या’ मागण्या
शेतकऱ्यांनी आता शेती करणं सोडून द्यायचं का?, खतांच्या किंमती पुन्हा वाढल्या






