‘….वेळप्रसंगी किंमत मोजू’; अजित पवारांचं मोठं वक्तव्य

On: October 18, 2025 11:09 AM
Ajit Pawar Plane Crash
---Advertisement---

Ajit Pawar | माळेगाव (Malegaon) येथील विद्या प्रतिष्ठानच्या (Vidya Pratishthan) अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी संस्थेच्या पहिल्याच बैठकीत कामकाजाचा आढावा घेतला. संस्थेचा नावलौकिक परत मिळवण्यासाठी प्रसंगी मोठी किंमत मोजण्याची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीला नवनिर्वाचित पदाधिकारीही उपस्थित होते.

शैक्षणिक गुणवत्तेवर भर, शिष्यवृत्तीसाठी समिती :

संस्थेच्या ४५ वर्षांच्या परंपरेचा उल्लेख करत, काळासोबत बदलण्याची गरज अजित पवार यांनी व्यक्त केली. विद्या प्रतिष्ठानच्या सर्व शाखांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यावर त्यांनी भर दिला. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, स्वच्छता, सुरक्षा व्यवस्था आणि बस सेवा या कोणत्याही बाबतीत तडजोड केली जाणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. आर्थिक शिस्त पाळण्याचे सक्त आदेशही त्यांनी दिले.

यासोबतच, ‘खा. शरद पवार शिष्यवृत्ती योजना’ (Sharad Pawar Shishyavrutti Yojana) राबवण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली. या योजनेचे निकष ठरवण्याची जबाबदारी या समितीवर असेल. या समितीमध्ये गौरव जाधव (Gaurav Jadhav) आणि प्रल्हाद येरे (Pralhad Yere) यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

Ajit Pawar | नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची उपस्थिती :

अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या पहिल्याच बैठकीला संस्थेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष अॅड. अशोक प्रभुणे (Adv. Ashok Prabhune), खजिनदार युगेंद्र पवार (Yugendra Pawar) आणि विश्वस्त व खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची प्रमुख उपस्थिती होती.

या बैठकीला विश्वस्त दत्तात्रय अळबादे (Dattatray Albade), निलोफर इनामदार (Nilofer Inamdar), नितीन सातव (Nitin Satav), विजय कोळते (Vijay Kolte), राजेशकुमार तातेड (Rajeshkumar Tated), डॉ. राजेंद्र बारकुल (Dr. Rajendra Barkul), उदय पाटील (Uday Patil) आणि विश्वास देवकाते (Vishwas Deokate) यांच्यासह इतर विश्वस्तही उपस्थित होते.

News title : Ajit Pawar Takes Charge at Vidya Pratishthan

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now