Ajit Pawar l राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय नेते महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राज्यभर जनसन्मान यात्रा सुरु आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे अहेरी या भागात आहहेत. यावेळी चूक भूल करू नका, बापासोबत राहा…. बापापेक्षा लेकीवर प्रेम कोणाचाच जास्त नसतं असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्येला दिला आहे.
वस्ताद सगळचं शिकवत नसतो; बापासोबत कायम राहा… :
यासंदर्भात अजित पवार म्हणाले की, विरोधकांकडून सध्या घर फोडण्याचे काम जोरात सुरू आहे. त्यामुळे विरोधकांनी मुलीला जिल्हा परिषद अध्यक्ष बनवलं आहे. ज्या बापाने जन्म दिला तीच मुलगी आता बापाविरोधात गेल्याचे दिसत आहे. मात्र मला त्यांना एक सांगायचे आहे की, ज्यावेळी वस्ताद शिकवतो त्यावेळी तो कधीही सगळं शिकवत नाही. तो कायम एक डाव राखूनच ठेवत असतो. त्यामुळे अजूनही चूक भूल करू नका, बापासोबत कायम राहा…
बापापेक्षा लेकीवर प्रेम कोणाचेच जास्त नसते असे असताना तुम्ही घरामध्ये फूट पाडण्याचे काम करत आहेत. मात्र हे बरोबर नाही. तसेच समाजाला देखील हे आवडत नाही, त्यासंदर्भात आम्ही देखील अनुभव घेतला आहे. त्यामुळे मी त्यातूनच माझी चूक मान्य केली आहे. मात्र आता माझे सांगणे आहे की, वस्तादने एक डाव राखून ठेवला आहे, तो डाव खेळण्याची वेळ आणू देऊ नका.
Ajit Pawar l आम्हाला आपलं सहकार्य हवयं : अजित पवार
सध्या राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवली आहे. मात्र विरोधी पक्षनेते योजना बंद करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. मात्र योजना सुरू ठेवण्यासाठी आम्हाला आपलं सहकार्य हवं आहे. आम्ही सध्या 3 योजना दिल्या आहेत. यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मोफत सिलिंडर आणि गरीब मुलींना 11 वीनंतर मोफत शिक्षण अशा योजना आहेत.
याशिवाय पावसामुळे मोठं नुकसान देखील झालं आहे त्यामुळे 1 रुपयात सरकार विमा देत आहेत. याशिवाय आदिवासी योजनांसाठी देखील 15 हजार 360 कोटी अर्थसंकल्पात आपण तरतूद केली असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत.
News Title : Ajit Pawar Statement On Dharmaraobaba Atram Daughter
महत्त्वाच्या बातम्या-
कोरोनापेक्षाही धोकादायक आजार; शरीराचा ‘हा’ भाग करतोय खराब
भाजपने ‘या’ 4 नेत्यांवर टाकली विधानसभा निवडणुकीची जबाबदारी!
रामदास कदम यांना घरातूनच मिळणार मोठा झटका!
पिवळ्या दातामुळे चारचौघांत होतंय हसू?, लगेच ‘हा’ उपाय करा, हिऱ्यासारखी येईल चमक






