Ajit Pawar Meets Sharad Pawar l राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज 12 डिसेंबर रोजी राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांची दिल्ली येथे भेट घेतली. अजित पवार यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, मुलगा पार्थ पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल देखील उपस्थित होते. मात्र आज या सर्वांनी आज दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलं आहे.
चर्चा काय झाली? :
यावेळी अजित पवार आणि शरद पवार यांच्या जवळपास अर्धा तास झालेल्या भेटीची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा होतआहे. महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने अनेक तर्क वितर्क वर्तवले जात आहेत. मात्र या भेटीमध्ये नेमका काय झालं? याबद्दल स्वत: अजित पवार यांनी माहिती दिली आहे.
आज साहेबांचा वाढदिवस असून उद्या काकींचा देखील वाढदिवस आहे, त्या दोघांचे दर्शन घेण्याकरता आम्ही आज गेलो होतो. तसेच आम्ही त्यांचं दर्शन घेतलं, चहा पाणी झाल्यावर इतर वेगवेगळ्या चर्चा देखील झाल्या आहेत. याशिवाय परभणीला असं का घडलं? इतर ठिकाणी नेमका काय चाललंय. लोकसभा, राज्यसभा का कमी चालली? महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार नेमका कधी होणार आहे. तसेच अधिवेशन केव्हा आहे, अशी चर्चा झाल्याचं अजित पवारांनी सांगितलं आहे.
Ajit Pawar Meets Sharad Pawar l ‘या’ दिवशी होणार मंत्रिमंडळ विस्तार :
याशिवाय राजकीय विषय कसले, आपण यासंदर्भात चर्चा करतोच का? आता एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री झालेत. तसेच बाकीचे मंत्रिमंडळ कधी होणार, कारण 16 तारखेपासून आता बिलं आहेत. तसेच या सर्व प्रश्नांची उत्तर द्यायला त्या त्या खात्याचे मंत्री असणं गरजेचं आहे. त्यामुळे बहुतेक 14 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहेत. तसेच मी घरातलाच आहे ना, मी अमित शहांना देखील आज भेटायला जाणार आहे. तसेच राजकारणापलीकडे काही संबंध असतात. त्यामुळे टीका कुठे असते, असं देखील अजित पवार म्हणाले आहेत.
News Title – Ajit Pawar-Sharad Pawar meeting in Delhi
महत्त्वाच्या बातम्या-
लाडक्या बहीणींसाठी गुड न्यूज, ‘त्या’ निकषांबाबत महत्वाची माहिती समोर
“पैशांच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजे…” नाना पटोले स्पष्टच बोलले
भाजपचा मेगा प्लॅन तयार! पुढील टार्गेट पुणे महानगरपालिका
मंत्रीमंडळ विस्तारापूर्वीच दोन्ही पवारांची दिल्लीत भेट, नव्या राजकीय समिकरणांची नांदी?
सर्वात मोठी बातमी! अजित पवार शरद पवारांच्या भेटीला, दिल्लीत मोठी खलबतं?






