“माझा भाऊ…”; अजित पवार यांचा भाऊ श्रीनिवास पवार यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा

On: February 15, 2025 8:56 PM
ajit pawar Shrinivas pawar
---Advertisement---

Ajit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) फुटीनंतर पवार कुटुंबातही मोठी फूट पडली आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत पवार विरुद्ध पवार अशी लढत पाहायला मिळाली. प्रचारादरम्यान एकमेकांवर जोरदार टीका करण्यात आली होती. मात्र, आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी “माझा भाऊ सोबत नाही” अशी खंत व्यक्त करत भावनिक प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार यांची भावनिक प्रतिक्रिया-

बारामती विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्याविरोधात त्यांचा पुतणे युगेंद्र पवार (Yugendra Pawar) उभे राहिले होते. मुलाच्या विजयासाठी स्वतः युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार (Shrinivas Pawar) मैदानात उतरले होते, त्यांनी अजित पवार यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. तसेच प्रचारादरम्यान अजित पवार यांच्यावर थेट टीका केली होती.

यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, “स्वतःच्या घरात काय जळतंय ते आधी बघावं, मग दुसऱ्यांच्या घराचा विचार करावा, असं मी पूर्वी रेटून बोलायचो, पण आता दबकत बोलतो. कारण आज माझा भाऊच माझ्यासोबत नाही.” एकप्रकारे निवडणुकीत अजित पवार यांचे त्यांच्या भावासोबत संबंध ताणले गेले, ते अद्याप व्यवस्थित झाले नसल्याचं अजित पवार यांच्या वक्तव्यावरुन लक्षात येत आहे.

लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घोषणा

जालन्यातील एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी “लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana)” संदर्भात मोठी घोषणा केली. ते म्हणाले, “या योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता पुढील आठ दिवसात मिळणार आहे. आम्ही दिलेला शब्द पाळतो. राज्य सरकार आर्थिक शिस्त पाळत पावले उचलत आहे. कालच मी ३५०० कोटी रुपयांच्या चेकवर सही केली आहे, त्यामुळे माझ्या बहिणींना लवकरच पैसे मिळतील.”

“योजना बंद होणार” या अफवांवर सुद्धा त्यांनी स्पष्टीकरण दिलं. अजित पवार यांनी स्पष्ट केलं की, “लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र, राज्य सरकार निर्णय घेईल त्यामुळे कोणीही चुकीच्या गोष्टी पसरवू नयेत.”

English Title: Ajit Pawar Regrets Rift with Brother Shrinivas Pawar

https://thodkyaat.com/lok-sabha-candidature-for-chandrakant-patil-from-bjp/

https://thodkyaat.com/chanakya-gave-a-big-warning/

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now