“सासरा पळून पळून कुठं जाईल”; संतापलेल्या अजितदादांनी पोलिसांना दिला ‘हा’ महत्वाचा आदेश

On: May 22, 2025 3:57 PM
Vaishnavi Hagawane Case Updates
---Advertisement---

Vaishnavi Hagawane | पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार (AJit Pawar) यांनी थेट प्रतिक्रिया दिली आहे. सासरच्या लोकांकडून होणाऱ्या छळामुळे वैष्णवीने आयुष्य संपवलं. यामध्ये तिच्या सासऱ्याचाही सहभाग असल्याचा आरोप आहे. तो राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असल्याने या घटनेला राजकीय वळण लागलं आहे.

या पार्श्वभूमीवर पुण्यातील एका सभेत बोलताना अजित पवार यांनी कठोर कारवाईचं आश्वासन दिलं. “सासू, नणंद आणि नवरा तुरुंगात आहेत. सासरा मात्र फरार आहे. त्याला पकडण्यासाठी तीन नव्हे, तर सहा पथकं तयार करा, असा मी आदेश दिला आहे,” असं अजितदादा म्हणाले. त्यांनी स्पष्ट केलं की आरोपी कुठल्याही पक्षाचा असला तरी कारवाई होणारच. (Vaishnavi Hagawane Death)

“लाडकी बहीण योजना मीच आणली”; महिलांच्या सन्मानाचा दावा :

या प्रकरणात आपल नाव घेतलं जात असल्याबद्दल अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली. “प्रेमापोटी लग्नाला जावं लागतं. आम्ही राजकारणी आहोत, लोक नाराज होतील म्हणून लग्नाला जातो. त्यामुळे माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही,” असं स्पष्ट करत त्यांनी गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. (Vaishnavi Hagawane Death Case Update)

त्याच वेळी त्यांनी ‘लाडकी बहीण योजना’ या राज्य सरकारच्या महत्त्वाच्या उपक्रमाचा उल्लेख करत आपली बाजू मांडली. “मीच पठ्ठ्याने महिलांना दरमहा १५०० रुपये देण्याची लाडकी बहीण योजना सुरू केली. याआधी कुणीही अशी योजना आणली नव्हती,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं. तसेच महिलांविषयी कोणतीही योजना आल्यानंतर ती त्वरीत मंजूर करण्याचंही त्यांनी सांगितलं.

Vaishnavi Hagawane | “माझा दोष सिद्ध झाला तर फासावर लटकवा” – अजित पवार यांचे थेट आव्हान :

अजित पवारांनी भाषणाच्या शेवटी एक थेट आणि भावनिक आवाहन करत म्हटलं, “या प्रकरणात माझा काही संबंध असेल, तर मला खुशाल फासावर लटकवा. पण केवळ नाव जोडून बदनामी करू नका,” अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. (Vaishnavi Hagawane Death)

या प्रकरणातील शवविच्छेदन अहवालातून समोर आलेल्या बाबी आणि आरोपींचे राजकीय संबंध यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. पोलिस तपास वेगात सुरू असून, अजित पवारांनी दिलेली थेट प्रतिक्रिया आता चर्चेचा विषय ठरत आहे.

News Title : Ajit Pawar reacts to Vaishnavi Hagawane case, mentions ‘Ladki Bahan Yojana’ and challenges accusers

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now