अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवार मोठा खुलासा करणार; वाचा रोहित पवारांची प्रतिक्रिया

On: February 10, 2026 12:19 PM
Ajit Pawar Plane Crash
---Advertisement---

Ajit Pawar Plane Crash | अजित पवार यांच्या बारामतीतील विमान अपघाताला आता नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. या घटनेबाबत पवार कुटुंबाच्या मनातही अनेक प्रश्न उपस्थित झाले असून, आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाचे खुलासे करण्याचे संकेत दिले आहेत. त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

रोहित पवारांची पत्रकार परिषद आणि सूचक पोस्ट :

आमदार रोहित पवार (rohit pawar) यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की बारामतीतील विमान दुर्घटनेत अजित पवार यांच्या निधनाबाबत महाराष्ट्रासह त्यांच्या मनातही अनेक शंका आहेत. या सर्व मुद्द्यांवर ते मंगळवार, १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर (Yashwantrao Chavan Centre) येथे पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देणार आहेत. त्यांनी या परिषदेत डोळे उघडणारे मुद्दे मांडणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या पत्रकार परिषदेत रोहित पवार विमान अपघाताचा तांत्रिक घटनाक्रम, हवामानाचा अहवाल तसेच उड्डाणापूर्वीचे काही संशयास्पद तपशील यावर प्रकाश टाकण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा अपघात केवळ तांत्रिक कारणांमुळे झाला की त्यामागे काही वेगळे कारण होते, यावर नवी चर्चा सुरू झाली आहे. राजकीय वर्तुळातही या पत्रकार परिषदेची मोठ्या प्रमाणावर उत्सुकता निर्माण झाली आहे.

Ajit Pawar Plane Crash | विमान अपघाताचा घटनाक्रम आणि राजकीय प्रतिक्रिया :

२८ जानेवारी रोजी बारामती (Baramati) येथे अजित पवार (Ajit Pawar Death) यांच्या खासगी विमानाचा भीषण अपघात झाला होता. विमानतळावर उतरत असताना तांत्रिक बिघाडामुळे विमान जमिनीवर आदळले आणि क्षणात पेट घेतला. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह विमानातील इतर सहकाऱ्यांचाही जागीच मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली होती आणि राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली होती.

विशेष म्हणजे, अपघाताच्या वेळी हवामान पूर्णपणे अनुकूल असतानाही विमान नेमके कसे कोसळले, याबाबत अनेक तांत्रिक प्रश्न उपस्थित झाले आहेत. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांनी विमानात स्फोट झाला असावा किंवा बॉम्ब ठेवल्याची शक्यता व्यक्त केली होती. त्याचवेळी अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येतील का, यावरही चर्चा रंगली होती. यावर रोहित पवार यांनी १२ फेब्रुवारी रोजी दादांची याबाबतची नेमकी इच्छा स्पष्ट करणार असल्याचे सांगितले होते. आता त्यांच्या पत्रकार परिषदेने या संपूर्ण प्रकरणात आरोप-प्रत्यारोपांची नवी फेरी सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

News Title: Ajit Pawar Plane Crash Twist

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now