विधानसभेतही अजितदादा बॅकफूटवर; लोकसभेची पुनरावृत्ती होणार का?

On: November 21, 2024 12:38 PM
Ajit Pawar
---Advertisement---

Ajit Pawar l महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले आहे. मात्र या निवडणुकीचा निकाल हा 23 नोव्हेंबर 2024 रोजी लागणार आहे. मात्र आता निकाल लागण्यापूर्वीच एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. तर या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, महाराषट्रात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर, काँग्रेस सर्वाधिक फायदा होणारा पक्ष ठरणार असल्याचं दिसून येत आहे. मात्र, या विधानसभेत अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष सहाव्या क्रमांकाचा पक्ष ठरणार असल्याचा पोलचा अंदाज आहे.

विधानसभेतही अजित पवार बॅकफूटवर :

कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार यांनी बंड करुन भाजप व शिवसेना शिंदे गट यांच्या महायुतीत येण्याचा निर्णय घेतला. मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांची जादू फार चालली नाही. कारण लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा एकच खासदार निवडून आला आहे.

मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या निकालानुसार अजित पवारांची राष्ट्रवादी सहाव्या क्रमांकावर जाईल असा अंदाज वर्तवला जात आहे. तर या विधानसभेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 42 हून अधिक जागांवर यश मिळेल असं एक्झिट पोल्सचा अंदाज आहे. तर दुसरीकडे हेच एक्झिट पोल अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 22 ते 25 जागा मिळतील असा अंदाजही वर्तवत आहेत.

Ajit Pawar l महाराष्ट्रात ‘हा’ पक्ष ठरणार नंबर 1 :

अशातच आता विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना पार पडला आहे. मात्र यानंतर आलेल्या एक्झिट पोल्समध्ये भाजप हा पक्ष क्रमांक एकचा ठरणार आहे. तर काँग्रेस क्रमांक दोनचा पक्ष असणार असा अंदाज वर्तवला जात आहे.

कारण एक्झिट पोल्सचे जे अंदाज समोर आले आहेत. त्यानुसार महाराष्ट्रात भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे. तर काँग्रेस सर्वाधिक फायदा होणारा पक्ष ठरणार असल्याचं दिसून येत आहे. तर यावेळी भाजपाला 80 ते 110 जागा मिळतील असे अंदाज आहेत. त्यापाठोपाठ 58 ते 70 जागांचा अंदाज काँग्रेसला वर्तवण्यात आला आहे.

News Title –  ajit pawar ncp will at sixth position

महत्त्वाच्या बातम्या-

मविआचा मुख्यमंत्री कोण असेल? संजय राऊतांनी दिलं उत्तर

राज्यात कुणाचं सरकार येणार?, प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकीत समोर

‘या’ गोष्टींमुळे सरकार आमचंच येणार; भुजबळांना अतिविश्वास

राज ठाकरे ठरणार किंगमेकर?, मनसेबाबत काय सांगते एक्झिट पोल्सची आकडेवारी?

“ही लढाई हिंदुत्वाची, आपला धर्म वाचवायचा..”; केतकी चितळेचा नवा व्हिडिओ समोर

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now