अजित पवार रात्री एक वाजता अमित शाहांच्या भेटीला; दिल्लीत मध्यरात्री मोठी खलबतं

On: July 24, 2024 12:03 PM
Ajit Pawar Meet Amit Shah Late Night At Delhi Marathi News
---Advertisement---

Ajit Pawar | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांच्यात रात्री 1 वाजता भेट झाली. अचानक रात्री अजित पवार आणि अमित शाह यांच्यात भेट झाली. अजित पवार यांच्यासोबत त्यांचे सहकारी खासदार सुनील तटकरे, आणि  प्रफुल पटेल हे देखील होते. त्यांची अमित शाहांसोबत भेट 40-45 मिनिटं चालली. या भेटीत नेमकं काय घडलं याबाबतची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

रात्री 1 वाजता झाली भेट

रात्री 1 वाजता अजित पवार आणि अमित शाह यांची भेट झाली. दिल्लीतही मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. यामुळे अचानक अजित पवारांच्या दिल्ली दौऱ्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 40-45 मिनिटं ही भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास अजितदादा हे मुंबईत होते. त्यांच्यासह सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल देखील होते. (Ajit Pawar)

केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात आंध्र प्रदेश आणि बिहारला भरघोस निधी देण्यात आला. आंध्र प्रदेशला 15000 कोटी निधी देण्यात आला. त्यानंतर बिहारला तब्बल 26000 कोटी निधी देण्यात आला. मात्र महाराष्ट्राला काहीही मिळालं नसल्याचं दिसून आलं आहे. त्याच रात्री अजितदादा (Ajit Pawar) हे अमित शाहांच्या भेटीला गेले, यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

अमित शाहांचा शरद पवारांवर हल्लाबोल

अमित शाह नुकतेच राज्याच्या दौऱ्यावर येऊन गेले. पुण्यात त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं. त्यावेळी त्यांनी राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका केली. शरद पवार हे राज्यातील भ्रष्टाचारांचे सूत्रधार असल्याचा आरोप अमित शाहांनी केला. अशातच अजित पवारांची दिल्लीवारी झाल्याने चांगली चर्चा रंगली आहे.

लोकसभा निवडणुकीचा विचार केल्यास महायुतीला म्हणावं असं यश मिळालं नाही. तसेच अजित पवार गटाने लोकसभा निवडणुकीत केवळ रायगड या जागेवर विजय मिळवला आहे. त्यामुळे अजितदादा गटातील सुनील तटकरे सध्या खासदार आहेत.  (Ajit Pawar)

तर दुसरीकडे भाजपने विधानसभेसाठी जोरदार आघाडी उघडली आहे. शिंदे गट पण सक्रिय झाला आहे. अजितदादा आणि अमित शाह यांच्यात जागावाटपाबाबत बैठक झाली असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे.

News Title – Ajit Pawar Meet Amit Shah Late Night At Delhi

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगेंच्या आरक्षणाला स्थगिती, सरकारला ‘या’ तारखेपर्यंत दिला वेळ

“माझी छाती फाडली तर शरद पवार दिसतील”, अजितदादा गटातील आमदाराच्या मुलाचं मोठं वक्तव्य

काळजी घ्या! ‘या’ भागांत पावसाचा जोर वाढणार, रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

“तथाकथित चाणक्य आणि महाराष्ट्रातील सत्ताधारी नेत्यांची दिल्लीतील लायकी…”; रोहित पवारांचा हल्लाबोल

गुडन्यूज! बजेटनंतर सोनं तब्बल ‘इतक्या’ हजारांनी स्वस्त, खरेदीसाठी ग्राहकांची एकच गर्दी

Join WhatsApp Group

Join Now