Ajit Pawar l विधानसभा निवडणुकीचे वारे सर्वत्र फिरत आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जन सन्मान यात्रा सुरू आहे. अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जन सन्मान यात्रा मावळ येथे आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेशी संवाद साधला आहे.
अजित पवारांचं वक्तव्य होतंय व्हायरल :
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जन सन्मान यात्रेला मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थिती लावली होती. यावेळी अजितदादांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात पुन्हा एकदा भाष्य केलं आहे. मावळ येथील जनसन्मान यात्रेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलं आहे की, तुम्हाला हात जोडून सांगायचं आहे की, मुलं बाळ होतात ही देवाची कृपा किंवा अल्लाची कृपा आहे असं म्हणतात.
मुलं होण्यामध्ये देवाची वगैरे काही कृपा नसते. तर नवऱ्याची कृपा असते म्हणून पोर बाळं होतात. त्यामुळे कृपा करुन दोन मुलांवरचं थांबा. जर दोन मुलांवर थांबलात तर सरकारच्या अधिक योजनांचा लाभ घेता येईल. तसेच त्यांना शिकवता येईल असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.
Ajit Pawar l 80 कोटी लोकांना भारतात मोफत अन्नधान्य :
पुण्यातील मावळमध्ये मागासवर्गीय समाज हा जास्त प्रमाणात आहे. जर लहान कुटुंब ठेवलं तर सरकारच्या या योजनांचा आधिक फायदा तुम्हाला घेता येऊ शकतो. त्यामुळे त्या दोन मुलांना तुम्ही चांगलं शिक्षण देऊ शकाल. तसेच चांगल्या पद्धतीने सांभाळ देखील करु शकता.
याशिवाय तुम्ही देखील चांगलं जीवन जगू शकता. तसेच राज्य सरकार 80 कोटी लोकांना भारतात मोफत अन्नधान्य तर देताच आहोत. हे जनसन्मान योजनेच्या माध्यमातून याच महत्त्वाच्या गोष्टी जनतेला सांगायच्या होत्या असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत.
News Title- Ajit Pawar Viral Statement
महत्वाच्या बातम्या-
एफडीसाठी चांगली संधी! सर्व बँका देतायेत भरघोस व्याज; जाणून घ्या किती?
मविआचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरला?, उद्धव ठाकरेंनी केली मोठी घोषणा
क्रिकेटप्रेमींनो लवकरच रंगणार दुलीप ट्रॉफी स्पर्धा! BCCI ने निवडले चार नवे कर्णधार
महत्वाची बातमी! ‘या’ दिवशी सर्व दवाखाने राहणार बंद; इमर्जन्सी असल्यास काय?
“नवाब सैफ अली खान तिसरी बेगम आणण्याच्या तयारीत?”; सोशल मीडियावर रंगल्या चर्चा






