लाडक्या बहिणींना अजितदादांचा नवा वादा! रकमेत होणार भरघोस वाढ

On: November 6, 2024 1:09 PM
Ajit Pawar
---Advertisement---

Ajit Pawar l राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात रंगली आहे. मात्र आता या निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील सर्वच पक्ष आपापले जाहीरनामे प्रसिध्द करत आहेत. अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचा देखील जाहीरनामा प्रसिध्द झाला आहे. मात्र या जाहीरनाम्यामध्ये अजित पवारांनी राज्यातील

लाडकी बहीण योजनेच्या निधीमध्ये होणार वाढ :

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींना मोठा वादा केला आहे. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मिळणाऱ्या रकमेत देखील मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे 1500 वरून 2100 रुपये देणार असल्याचं जाहीरनाम्यामध्ये सांगण्यात आलं आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचा जाहीरनामा प्रसिध्द करताना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, महायुती सरकारच्या काळात जे काम केलं ते लोकांपर्यंत घेऊन आम्ही चाललो आहोत. मात्र आम्ही काही बदल करणाऱ्या योजना गेल्या 4 महिन्यात केल्या आहेत. मात्र आता लाडकी बहीण योजना आर्थिक दुर्बल घटकातील मुलींना शिक्षणासाठी पैसे अशा अनेक योजना जाहीर केल्या आहेत. त्यामुळे या योजनांना देखील प्रचंड प्रतिसाद मिळत आहे असं सुनील तटकरे म्हणाले आहेत.

Ajit Pawar l 2 कोटी 30 लाख महिलांना लाभ मिळणार :

याशिवाय राज्यातील स्थानिक पातळीवरील जाहीरनाम्यामध्ये आमदारांच काम मांडलेले असेल. परंतु आम्ही सुरू केलेल्या हेल्पलाइनला 25 लाख देखील कॉल आले आहेत. मात्र आता आम्ही टोल फ्री नंबर देखील सुरू करत आहोत. तसेच महायुतीने 9861717171 हा टोल फ्री नंबर देखील सुरू केला आहे.

मात्र यावर तालुका स्तरीय जाहीरनामा ऐकता येणार आहे. त्यामुळे आता लाडकी बहीण योजेनच्या पैशात मोठ्या प्रमाणात वाढ करत आहोत. तसेच आता आम्ही लाडकी बहीण योजनेचा निधी वाढवून 2100 रुपये करणार आहोत. त्यामुळे आता 2 कोटी 30 लाख महिलांना याचा लाभ मिळणार आहे.

News Title : Ajit Pawar Manifesto

महत्त्वाच्या बातम्या-

राज्यात विधानसभेला मेहुणे-मेव्हण्यात होणार टशन!

चंद्रकांत पाटलांच्या पुढाकारातून गदिमांच्या स्मारकाचं 70 टक्के काम पूर्ण!

“देवेंद्रजी तुमचे पूर्वज मुघलांची चाकरी करायचे, ही फडणवीसी राज्यात दाखवू नका”

राज्यातील ‘या’ भागात बरसणार पाऊस; IMD चा इशारा

राहुल गांधी करणार 5 गेमचेंजर घोषणा, मविआच्या गॅरंटीत कोणते मुद्दे?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now