अजितदादांची धाकधूक वाढली! भाजप अजितदादांना देणार दे धक्का?

On: December 12, 2024 4:47 PM
Ajit Pawar
---Advertisement---

Ajit Pawar l महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येऊन अनेक दिवस उलटले आहेत. मात्र अद्यापही महायुतीमधील खातेवाटपाचा तिढा सुटलेला नाही. यावेळी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद मिळालं आहे. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद मिळालं आहे. मात्र यानंतर आता एकनाथ शिंदेंना गृहमंत्रीपद हवं आहे. परंतु, शिंदेंना गृहमंत्रीपद देण्याची भाजपची तयारी नाही. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांनादेखील भाजप धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे.

खातेवाटपाचा पेच अद्याप कायम :

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल दिल्लीला होते. तसेच त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील दिल्लीत आहेत. परंतु, एकनाथ शिंदे दिल्लीला गेलेले नाहीत. त्यामुळे खातेवाटपाचा पेच अद्याप कायम असल्याचं दिसत आहे. याशिवाय भाजप नेतृत्त्वाशी चर्चा करुन कॅबिनेटचा विस्तार करण्याचा देवेंद्र फडणवीसांचा प्रयत्न आहे. पण महत्त्वाच्या खात्यांचा तिढा हा कायम आहे.

अशातच आता विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला 16 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. मात्र त्याआधी मंत्रिमंडळ विस्तार करण्याचे प्रयत्न जोमाने सुरु आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना देखील त्यांच्याकडे गृहमंत्रिपद होतं. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंना गृह विभागाची जबाबदारी मिळावी अशी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची मागणी आहे.

Ajit Pawar l अजितदादांना धक्का बसणार? :

याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवारांना अर्थ मंत्रालय मिळत असेल तर मला गृह मंत्रालय मिळावं अशी स्पष्ट मागणी एकनाथ शिंदेंकडून करण्यात आली आहे. तसेच अजित पवारांना अर्थ खातं सांभाळण्याचा अनुभव हा दांडगा आहे.

मात्र भाजप पक्षाकडे असलेलं संख्याबळ आणि महत्त्वाच्या खात्यांसाठी असलेला त्यांचा आग्रह पाहता उपमुख्यमंत्री अजित पवारांना अर्थ मंत्रालय सोडावं देखील लागू शकतं. त्यामुळे अर्थखातं हे भाजपला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजित पवार यांना भाजप धक्का देऊ शकत असं बोललं जात आहे.

News Title –Ajit Pawar Likely To Loose Finance Ministry

महत्त्वाच्या बातम्या-

केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय! यापुढे ‘एक देश, एक निवडणूक’ …?

नवीन राजकीय समिकरणं जुळणार? उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना फोन; ‘या’ विषयावर झालं बोलणं

शेतकऱ्यांनी कांद्याच्या दरामुळे केंद्राकडे केली मोठी मागणी!

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या 14 वर्षीय मुलाच्या मृत्यूने खळबळ!, मित्रांसोबत बाहेर गेला आणि…

दोन्ही पवारांमध्ये बंद दाराआड काय चर्चा झाली? दादांनी सर्वकाही सांगितलं

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now