कट्टर समर्थकाचा अजित पवारांना मोक्याच्या वेळी धक्का, पुण्यात मोठी उलथापालथ?

On: October 22, 2024 12:13 PM
Ajit Pawar
---Advertisement---

Pune | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांनी महायुतीला सुरुंग लावण्यास सुरुवात केली आहे. पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांनी एकापाठोपाठ एक धमाके करत महायुतीच्या अडचणी वाढवल्या आहे. भाजप, अजित पवार (Ajit Pawar) गटातील अनेक नेते तुतारी हात घेत आहेत. जागावाटपात संधी मिळत नसल्याचं लक्षात येताच अनेकांनी शरद पवार गटाची वाट धरली आहे. आता आणखी एक नेता तुतारी फुंकण्याच्या तयारीत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांना आणखी एक धक्का बसणार असल्याचं दिसतंय. अजित पवारांचे खंदे समर्थक समजले जाणारे नाना काटे (Nana Kate) शरद पवार गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघात अजित पवारांना धक्का बसणार आहे. नाना काटे यांचं जयंत पाटलांशी बोलणं झाल्याची माहिती आहे. नाना काटे (Nana Kate) समर्थकांसह मुबंईत शरद पवारांची भेट घेणार आहेत.

बालेकिल्ल्यात अजित पवारांना धक्का

पिंपरी-चिंचवड हा अजित पवार (Ajit Pawar) यांचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या काही वर्षांपासून या पट्ट्यातील प्रमुख नेते अजित पवार यांच्याशी निष्ठावान राहिले आहेत. नाना काटे (Nana Kate) हेदेखील अजित पवार यांच्या कट्टर समर्थकांपैकी एक म्हणून ओळखले जातात.

अजित पवार हे सध्या महायुतीसोबत असले तरी जागावाटपात चिंचवडची जागा भाजपच्या विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांना मिळणार असल्याचं जवळपास निश्चित होतं. अशात भाजपने अश्विनी जगताप यांना उमेदवारी न देता त्यांचे दीर शंकर जगताप यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

Nana Kate शरद पवार गटात जाणार

दुसरीकडे महाविकास आघाडीत चिंचवडची जागा शरद पवार गटाच्या वाट्याला येऊ शकते. त्यामुळेच नाना काटे यांनी शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय. अजितदादा यांच्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) साहेबांशी माझी नाळ अधिक जुळलेली आहे. तेव्हा तुतारी फुंकल्यावर आवाज येईलच, असं नाना काटे म्हणाले होते.

दरम्यान, पुणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. त्यातही पिंपरी चिंचवड हा सर्वात कळीचा भाग मानला जातो. अजित पवारांसाठी पिंपरी चिंचवडचा गड महत्त्वाचा आहे. यामुळे अजित पवार आणि भाजपला चिंचवड विधानसभेत मोठा धक्का बसणार, हे उघड आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

दिवाळीनिमित्त एसटी महामंडळाने केली सर्वात मोठी घोषणा!

ठाकरेंचे 53 शिलेदार ठरले?, पाहा कुणाला मिळालं तिकीट तर कुणाचा पत्ता कट?

पुणेकरांसाठी सर्वात महत्वाची बातमी! आता यापुढे रोज रात्री 11 ते पहाटे 3 वाजेपर्यंत…

दहावीच्या परीक्षेत मोठा बदल, आता ‘या’ विषयात 20 गुण मिळाले तरी विद्यार्थी होणार पास

ये रिश्ता क्या केहलाता है?, रात्री 12च्या ठोक्याला दिलेल्या शुभेच्छांची खमंग चर्चा!

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now