“अजित पवार गटाच्या पेजनं अश्लिल पेजला फॅालो केलं”, शरद पवार गटाच्या दाव्याने खळबळ

On: September 19, 2024 6:23 PM
Ajit Pawar
---Advertisement---

मुंबई | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं फेसबुक पेज हॅक झाल्याचा संशय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आहे. अजित पवार यांचा फेसबुक पेजवरून आक्षेपार्ह मजकूर असणारे फेसबुक पेज फॉलो करण्यात आल्याने पक्षाने याबाबत संशय व्यक्त केला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

अजित पवार (Ajit Pawar) यांच्या फेसबुक अकाऊंटवरून अडल्ट कंटेंट असलेल्या पगलेट क्वीन नावाच्या फेसबूक पेजला काल रात्रीपासून फॉलो केलं जात आहे. यापूर्वी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या फेसबुक पेजवरून 4 जणांना फॉलो केलं जात होतं.

रात्री आणखी एका अकाऊंटला फॉलो करण्यात आलं. यामध्ये पार्थ अजित पवार, एनसी स्पीक्स, प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांच्या नावाचा समावेश होता. पण या चौघा अकाऊंटसोबत पगलेट क्वीन अकाऊंटला फॉलो करण्यात आलं आहे. या पेजवर अडल्ट कंटेंट शेअर केला जात आहे.

या घटनेनंतर आमदार शिवाजीराव गर्जे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. अजित पवारांच्या फेसबुक पेजचे स्क्रीनशॉट काढून ते सोशल मीडियावर जाणीवपूर्वक पसरवले जात आहे. याबद्दल सायबर क्राइम अंतर्गत गुन्हा नोंद करुन संबंधितांवर कायदेशीररित्या योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी आमदार शिवाजीराव गर्जे यांनी केली. यावर शरद पवार गटाने खळबळजनक दावा केला आहे. शरद पवार गटाचे योगेश सावंत यांनी ट्विटरवर एक स्क्रिन रेकॉर्डिंग व्हिडीओ शेअर केला आहे.

Ajit Pawar | शरद पवार गटाच्या दाव्याने खळबळ

अजित दादा गटातील नेते शिवाजीराव गर्जे यांनी आज एक पत्रक काढलं आहे आणि बदनामी करण्याच्या हेतून अजित दादांच्या पेजचे खोटे स्क्रिनशॉट पसरवले जात असल्याचं त्यामध्ये नमूद केलं आहे रात्री ते स्क्रिनशॉट टाकण्यापूर्वी आम्ही दादांच्या पेजच व्हिडीओ स्क्रिन रेकॉर्डिंग ही करून ठेवलं होतं त्याचा हा व्हिडीओ, असं सांगत योगेश सावंत यांनी ते स्क्रिनशॉट फेक नसल्याचं म्हटलंय.

एक खोटं लपवण्यासाठी लाख खोटं बोलावं लागतं बाकी अजित दादा गटातील नेत्यांनी नेमकं पेज हॅक झालं होतं की स्क्रिनशॉट फेक आहेत यावर एकमत करावं, असंही त्यांनी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या-

कंगना पुन्हा नको ते बोलली; भाजप नेत्याने दिला थेट इशारा

विधानसभा निवडणूका ‘या’ तारखे दरम्यान होणार! भाजप ‘इतक्या’ जागांवर निवडणूक लढवणार

सणासुदीच्या काळात खाद्य तेलाच्या किंमती वाढणार का?

राज्यात मॉन्सून पुन्हा सक्रिय, ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

कॅनरा बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! तब्बल ‘इतक्या’ जागांसाठी भरती सुरु

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now