मोठी बातमी! अजित पवार गटाचे 20 उमेदवार ठरले, संभाव्य यादी समोर

On: September 13, 2024 3:17 PM
Ajit Pawar
---Advertisement---

Ajit Pawar Group l महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची तयारी जोरदार सुरु झाली आहे. राज्यात नेतेमंडळी देखील सभा, मोर्चेबांधणी करण्यावर अधिक भर देतं आहेत. मात्र अद्याप विधानसभा निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र सध्या सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी थेट लढत होणार आहे. सध्या या दोन्ही घटक पक्षांच्या बैठका वारंवार पार पडताना दिसत आहेत. अशातच महायुतीची अद्याप जागावाटप जाहीर झाली नाही. मात्र असे असतानाही अजित पवार गटाच्या संभाव्य 20 उमेदवारांची यादी समोर आली आहे.

अजित पवार बारामतीमधून लढणार :

अजित पवार गटाची पक्षांतर्गत बैठक नुकतीच पार पडली आहे. या बैठकीला अजित पवार गटाचे जेष्ठ व दिग्गज नेते उपस्थित होते. या बैठकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या संभाव्य 20 उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

या यादीनुसार बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट होत आहे. तर बीड परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे हे रिंगणात उतरणार असल्याचे दिसून येत आहे.

Ajit Pawar Group l अजित पवार गटाच्या संभाव्य 20 उमेदवारांची यादी समोर :

बारामती मतदारसंघ – अजित पवार
येवला मतदारसंघ – छगन भुजबळ
आंबेगाव मतदारसंघ – दिलीप वळसे-पाटील
परळी मतदारसंघ – धनंजय मुंडे
कागल मतदारसंघ – हसन मुश्रीफ
दिंडोरी मतदारसंघ – नरहरी झिरवळ
रायगड मतदारसंघ – अदिती तटकरे
अहमदनगर मतदारसंघ – संग्राम जगताप
खेड मतदारसंघ – दिलीप मोहिते-पाटील
अहेरी मतदारसंघ – बाबा अत्राम
कळवण मतदारसंघ – नितीन पवार
इंदापूर मतदारसंघ – दत्ता भरणे
उदगीर मतदारसंघ – संजय बनसोडेट
पुसद मतदारसंघ – इंद्रनील नाईक
वाई खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघ – मकरंद आबा पाटील
पिंपरी मतदारसंघ – अण्णा बनसोडे
मावळ मतदारसंघ – सुनील शेळके
अमळनेर मतदारसंघ – अनिल पाटील
जुन्नर मतदारसंघ – अतुल बेनके
वडगाव-शेरी मतदारसंघ – सुनील टिंगरे

News Title – ajit pawar group declare 20 candidates list of Assembly election 

महत्त्वाच्या बातम्या-

मराठवाड्यात 25 आमदार पाडणार; ‘या’ नेत्याचा जरांगेंना इशारा

विदर्भात भाजपला मोठं खिंडार, माजी आमदार कॉँग्रेसमध्ये करणार घरवापसी?

दहा हजारांपेक्षा कमी किंमतीत 5G स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या किंमत, फीचर्स

आनंदवार्ता! दमदार बॅटिंगनंतर सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या लेटेस्ट दर

हार्दिक पांड्याच्या आयुष्यात नव्या मुलीची एन्ट्री?, नताशा म्हणाली…

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now