अजितदादांची स्मार्ट खेळी! फोनद्वारे केला पहिला उमेदवार जाहीर

On: September 30, 2024 1:46 PM
Ajit Pawar
---Advertisement---

Ajit Pawar l आगामी विधानसभा निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे नेतेमंडळी मोर्चेबांधणी करण्यात व्यस्त आहेत. अशातच आता उपमुख्यमंत्री अहित पवार हे ऍक्टिव्ह मोडवर आले आहेत. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी विद्यमान आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांना फोन करुन दीपक चव्हाण यांची विधानसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर केली आहे.

अजित पवारांनी उमेदवाराची केली फोनद्वारे केली घोषणा :

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, फलटण हा अनूसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ आहे. त्यामुळे या मतदारसंघातून यापूर्वी देखील तीन टर्ममध्ये दीपक चव्हाण हे निवडून आले आहेत. तसेच रामराजे नाईक निंबाळकर यांची सोळशीच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष अजित पवार यांनी फोनवरून फलटण विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराची थेट घोषणा केली आहे.

सातारा जिल्ह्यातील फलटण विधानसभा मतदारसंघातील उत्तर कोरेगाव तालुक्यातील सोळशी ग्रामपंचायतीच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उपस्थित राहता आले नाही. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभेतील नागरिकांसोबत फोनवरून संवाद साधला.

Ajit Pawar l अजित दादांची स्मार्ट खेळी :

त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी फलटण विधानसभा निवडणुकीसाठी विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांची पुन्हा एकदा उमेदवारीची घोषणा केली आहे. अजित पवारांच्या या स्मार्ट खेळीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत रामराजे नाईक निंबाळकर यांनी भाजप पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार देखील केला नव्हता. मात्र त्यावेळी निंबाळकर कुटुंबाने उघडपणे धैर्यशील मोहिते पाटील यांचा प्रचार केल्याची बाब समोर आली होता.

त्यामुळे रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यातील राजकीय संघर्ष चांगलाच वाढलेला दिसून येत आहे. अशातच आता रामराजे नाईक निंबाळकर यांच्या भाषणादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोनद्वारे दिपक चव्हाण हे येत्या विधानसभेला उमेदवार असल्याची घोषणा केल्याने सर्वच जण अचंबित झाले आहेत.

News Title : Ajit pawar declare phaltan assembly election ticket to deepak chavan

महत्वाच्या बातम्या –

टीम इंडियात पडली फूट? हार्दिक आणि शमीच्या ‘त्या’ धक्कादायक व्हिडीओमुळे चाहते टेन्शनमध्ये

खतरों के खिलाडीच्या विजेत्याला ट्रॉफीसह मिळालं बरचं काही? बक्षिसाची यादी पाहून व्हाल थक्क!

आज कर्कसह ‘या’ 5 राशींचे येणार सोन्याचे दिवस, उत्पन्न होणार डबल!

..आता याला काय म्हणावं?, मुंबईत शाळकरी मुलीने रचला स्वतःच्याच लैंगिक अत्याचाराचा बनाव

राज्यात पुढील 5 दिवस पावसाचे, पाहा कुठे-कुठे बरसणार पाऊस?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now