“तुमच्या चुकांवर पांघरुण घालून माझं पांघरुण अन् पदर फाटून गेलाय, आता माझा पदरच उरलेला नाही”

On: January 30, 2025 10:29 AM
Ajit Pawar
---Advertisement---

Ajit Pawar | बीड जिल्ह्यात गुन्हेगारी आणि चुकीच्या कृत्यांना माफी दिली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कठोर कारवाई करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. तीन ते चारपेक्षा अधिकवेळा गुन्ह्यात आढळून आल्यास मकोका (MCOCA) लावला जाईल, असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील गुंतवणुकीसाठी उद्योगपतींना सुरक्षित वातावरण हवे असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. (Ajit Pawar)

उद्योगपतींना खंडणीखोरांपासून संरक्षण

बीड जिल्ह्यात पवनचक्की, सौरऊर्जा यांसारखे मोठे प्रकल्प येत आहेत. त्यामुळे उद्योगपतींना खंडणी मागणाऱ्या आणि त्यांचा मार्ग रोखणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांना माफ केले जाणार नाही, असा इशारा अजित पवार यांनी दिला. गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे गुंतवणूकदार घाबरतात, आणि त्यामुळे जिल्ह्याचा विकास रोखला जातो.

नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना ताकीद

बैठकीदरम्यान, अजित पवार यांनी पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना देखील थेट इशारा दिला. “निवडणुकीत तुम्ही लाखों-कोट्यवधी रुपये खर्च करता, पण विकासकामांसाठी तुमच्या मनात तशी भावना का नाही?” असा सवाल त्यांनी केला. (Ajit Pawar)

सत्ता मिळाल्यानंतर अनेक हौशी-गवशी लोक त्यांच्या भेटीसाठी येतात, मात्र हे उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे लोक आता खपवून घेतले जाणार नाहीत. आता तसलं चालणार नाही, हे मी सांगतो. उद्या परत कोणी माझ्याकडे आलं, एवढ्यावेळेला पांघरुण घाला, असे म्हणतील. पण माझं पांघरुण फाटून गेलंय. एवढ्यावेळेस तुम्हाला पदरात घेऊन आता माझा पदरच उरलेला नाही. त्यामुळे सर्व नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना योग्यप्रकारे वागण्याच्या सूचना द्याव्यात.

स्वच्छ प्रतिमा ठेवा, विकासाला प्राधान्य द्या

बीड जिल्ह्यातील विकासकामांबाबत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे अजित पवार यांनी सांगितले. नेत्यांनी स्वच्छ प्रतिमा ठेवावी आणि लोकांनी विकासकामांबद्दल चांगले बोलावे, ही जबाबदारी सगळ्यांची आहे. विकासकामांसाठी केवळ पुढाऱ्यांनाच विचारले जाऊ नये, तर साहित्यिक, विचारवंत आणि पत्रकारांचाही सल्ला घेतला जावा, असे त्यांनी सुचवले. (Ajit Pawar)

भेदभाव न करता काम करण्याची ग्वाही

“मी कोणत्याही जाती-धर्मात भेदभाव करत नाही, मात्र इतरांनी केला तर मी त्यांना खपवून घेणार नाही,” असे अजित पवार यांनी ठणकावून सांगितले. ते पुढे म्हणाले, “आम्ही इकडे विटू-दांडू, गोट्या किंवा पतंग खेळायला आलेलो नाही, आम्ही इकडे काम करायला आलेलो आहोत.”

Title : Ajit Pawar Big Statement on Beed Crime

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now