पूरग्रस्तांना तात्काळ दिलासा! ‘त्या’ कुटुंबांना मिळणार थेट ५००० रुपये, अजित पवारांची मोठी घोषणा

On: September 26, 2025 10:38 AM
Ajit Pawar
---Advertisement---

Ajit Pawar | महाराष्ट्रातील अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गावे पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांचे हाल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधत महत्त्वाची घोषणा केली.

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, ज्यांच्या घरात पाणी शिरले आहे त्यांना तातडीने आर्थिक मदत म्हणून ५ हजार रुपये देण्यात आले आहेत. याशिवाय प्रत्येक कुटुंबाला ५ किलो गहू आणि ५ किलो तांदूळ म्हणजे १० किलो धान्य पुरविण्यात आले आहे. पाण्यामुळे धान्य भिजून खराब झाले असल्याने नागरिक अडचणीत आले आहेत. अशा परिस्थितीत प्रशासनाने त्यांना शाळा किंवा कार्यालयात तात्पुरता आसरा उपलब्ध करून दिला आहे.

प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न :

अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले की, पूरग्रस्तांना वाचवण्यासाठी मिलिट्री, एनडीआरएफ टीम आणि स्थानिक प्रशासन यांनी एकत्रित काम केले. अनेक नागरिकांना एअरलिफ्ट करून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. जिल्हा प्रशासन आणि अधिकारी रात्रंदिवस मदतकार्यात गुंतले असून नागरिकांच्या तातडीच्या गरजा पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. (Maharashtra floods)

मात्र, अजित पवारांनी मान्य केले की दिलेले १० किलो धान्य पूरग्रस्त कुटुंबांसाठी पुरेसे नाही. त्यामुळे अधिक अन्नधान्य आणि आवश्यक मदत कशी पुरवता येईल, यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Ajit Pawar | केंद्र सरकारची मदत अपेक्षित :

या अतिवृष्टीग्रस्त भागांचा नुकताच मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार यांनी दौरा करून आढावा घेतला आहे. त्यानंतर राज्य सरकारने केंद्राला मदतीसाठी पत्र पाठवले आहे. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना परिस्थितीची माहिती देण्यात आली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही (PM Narendra Modi) मदतीचे पत्र पाठवले असल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले.

पूरस्थिती हाताळण्यासाठी राज्य सरकारकडून तातडीचे उपाय केले जात आहेत, मात्र केंद्र सरकारकडूनही मदत मिळाल्यास या संकटाचा सामना अधिक सक्षमपणे करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पुन्हा पावसाचा धोका :

हवामान खात्याने २७, २८ आणि २९ सप्टेंबर रोजी पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जाहीर करण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Maharashtra Weather Alert)

अजित पवारांनी सोलापूर, धाराशिव, बीड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांचा दौरा करून तेथील लोकांना सावधानतेचा इशारा दिला. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

News title : Ajit Pawar Announces ₹5,000 Relief for Flood-Hit Families in Maharashtra | Heavy Rainfall Alert Continues

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now