अजितदादा आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं; ‘या’ बड्या आमदाराची इच्छा

On: October 11, 2024 2:06 PM
Maharashtra
---Advertisement---

Maharashtra l आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे राजकीय नेतेमंडळी मोर्चेबांधणी करण्यात व्यस्त आहेत. अशातच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक विधान केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

या दोन्ही नेत्यांनी एकत्र यावे :

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष अजित पवार यांनी राजकीयदृष्ट्या एकत्र यावं असं वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केलं आहे. कारण प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रक्ताचे आणि वैचारिक वारसदार, तर अजित पवार हे शिव-शाहू फुले-आंबेडकरांच्या विचारांचे वैचारिक वारसदार असल्याच आमदार अमोल मिटकरी म्हणाले आहेत.

तसेच अमोल मिटकरी पुढे म्हणाले की, मध्यंतरी आपण या दोन्ही नेत्यांनी एकत्र यावे या संदर्भात देखील प्रयत्न केले होते. मात्र त्याला दोन्ही पक्षांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. परंतु आता आपण शेवटच्या श्वासापर्यंत हे दोन्ही दिग्गज नेते एकत्र येण्यासाठीचे प्रयत्न सोडणार नाही असं आमदार अमोल मिटकरी म्हणाले आहेत.

Maharashtra l आंबेडकर आणि मिटकरींच्या बॅनरची सर्वत्र चर्चा :

याशिवाय13 ऑक्टोबरला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थित अकोला येथे होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या स्वागतासाठी आमदार अमोल मिटकरी आणि प्रकाश आंबेडकर यांचे एकत्रित फोटो असलेले बॅनर लागले आहेत. मात्र आता त्या बॅनरवरून पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीत देखील उपमुख्यमंत्री अजित पवार हे अगदी दहा मिनिटांतच उठून गेल्याची चर्चा होती. मात्र यावर मिटकरी म्हणाले की, अजितदादा हे कुठेही नाराज नाहीत. तसेच महाविकास आघाडी आणि शरद पवार गटाकडून जाणीवपूर्वक अशा चुकीच्या बातम्या पेरल्या जातात.

News Title – Ajit Pawar and Prakash Ambedkar Join 

महत्त्वाच्या बातम्या-

डिझेल वाहने बंद होणार? डेडलाईन जाहीर

दोन अग्नीवीरांचा मृत्यू; मृत्यूचे कारण ऐकून अंगावर येईल काटा

पुणे हादरलं! प्रेयसीला लॉजवर नेलं अन् त्याने..; पुढचा घटनाक्रम ऐकून थरथराल

पुण्यातील ‘या’ भागात भरधाव ऑडीने दुचाकीस्वाराला चिरडलं…

गुड न्यूज! दसऱ्या आधीच सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या आजचे दर!

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now