टीम इंडियाला मोठा झटका; स्टार खेळाडू कसोटी सामन्यातून बाहेर

On: May 24, 2025 4:19 PM
Team India
---Advertisement---

Team India | बीसीसीआयने इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघाची घोषणा केली आहे. मात्र या घोषणेसोबतच टीम इंडियासाठी एक मोठा झटका उघड झाला आहे. संघाचा प्रमुख आणि मॅचविनिंग गोलंदाज जसप्रीत बुमराह हा सर्व कसोटी सामने खेळू शकणार नसल्याची माहिती निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी दिली.

इंग्लंडविरुद्ध 20 जून ते 4 ऑगस्ट दरम्यान खेळल्या जाणाऱ्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचा 18 सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे. शुबमन गिल याची कसोटी कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली असून, ऋषभ पंतकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

बुमराह वर्कलोड मॅनेजमेंटमुळे काही सामने चुकणार :

पत्रकार परिषदेत बोलताना अजित आगरकर यांनी सांगितले की, “मला वाटत नाही की बुमराह सर्व 5 कसोटी सामने खेळू शकेल.” त्यांनी पुढे स्पष्ट केलं की बुमराहने आधीच बीसीसीआयला आपली उपलब्धता मर्यादित असल्याचं कळवलं आहे. वर्कलोड मॅनेजमेंटच्या कारणास्तव बुमराहने हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.

बुमराह याआधी बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024 मध्ये सर्व सामने खेळला होता. मात्र त्यावेळी त्याला पाठीत दुखापत झाली होती. यानंतर शस्त्रक्रियेद्वारे उपचार घेऊन बुमराह काही काळ क्रिकेटपासून दूर होता. त्यामुळे आगामी इंग्लंड दौऱ्यात सर्व सामने खेळणं त्याच्यासाठी कठीण असल्याचं मानलं जात आहे.

Team India | किती सामने खेळणार? निर्णय वेळेनुसार :

आगरकर यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, बुमराह तीन सामने खेळणार की चार, हे वेळेनुसार ठरणार आहे. त्यामुळे संघात असला तरी प्रत्येक सामन्यासाठी त्याची निवड करण्यात येईलच, असं निश्चित नाही.

बुमराह टीम इंडियाचा सर्वात विश्वासार्ह गोलंदाज असून त्याच्या अनुपस्थितीचा परिणाम संघाच्या कामगिरीवर होऊ शकतो. त्यामुळे आता बुमराह किती सामन्यांमध्ये मैदानात उतरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

News Title: Ajit Agarkar Confirms Jasprit Bumrah May Miss Some Tests During England Tour

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now