अजय काजोलचा घटस्फोट? सोशल मीडियावर पोस्ट करत दोघांनी सगळंच सांगून टाकलं

On: February 17, 2025 7:44 PM
Ajay Devgn Private Jet
---Advertisement---

Ajay Degvan | अजय देवगण (Ajay Devgan) आणि काजोल (Kajol) यांची प्रेमकहाणी बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहे. 24 फेब्रुवारी 1999 रोजी या दोघांनी विवाह केला होता. ‘हलचल’ (Hulchul) चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांची भेट झाली होती. त्यांना दोन मुले असून मुलगा युग (Yug) 2010 मध्ये आणि मुलगी न्यासा (Nysa) 2003 मध्ये जन्माला आली. सोशल मीडियावर दोघेही एकमेकांसाठी प्रेमभरल्या पोस्ट शेअर करत असतात, मात्र सध्या त्यांच्या नात्यात काही तरी बिनसले आहे, अशी चर्चा रंगली आहे.

पोस्टमुळे चाहत्यांमध्ये संभ्रम-

14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने काजोलने आपल्या इन्स्टाग्रामवर स्वतःचा सुंदर फोटो पोस्ट करत कॅप्शन दिले, “हॅपी व्हॅलेंटाईन डे टू मायसेल्फ… आय लव्ह यू! #selflove #thegreatestloveofall.” दुसरीकडे, अजयनेही (Ajay Devgan) त्याच दिवशी एक जुना रोमँटिक फोटो शेअर केला आणि लिहिले, “खूप आधीच ठरवले होते कोणासोबत हृदय शेअर करायचे… आणि आजही तेच कायम आहे! माझी #Valentine आज आणि रोज @itsKajolD.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Kajol Devgan (@kajol)

या दोन पोस्टमधील तफावतीमुळे सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी त्यावर विनोदी प्रतिक्रिया दिल्या, तर काहींनी त्यांच्या नात्यात बिघाड झाल्याचा अंदाज वर्तवला. एका युजरने कमेंट केली, “कलेश चालू आहे, मित्रांनो.”

लग्नाची भीती वाटते-

तर दुसऱ्याने लिहिले, “अजयने काजोलला व्हॅलेंटाईन डे विश केले, पण लग्नाची भीती वाटतेकाजोलने स्वतःलाच विश केले. आजकालच्या लग्नाची भीती वाटते.” आणखी एका चाहत्याने अंदाज लावला, “अजय नेहमीच तिच्याकडे दुर्लक्ष करतो आणि कधीच व्हॅलेंटाईन डे विश करत नाही, म्हणून काजोलने वैतागून अशी पोस्ट टाकली असावी.”

अजय आणि काजोलच्या आगामी चित्रपटांची चर्चा

अजय देवगणचा अलीकडचा चित्रपट ‘आझाद’ (Azaad) हा अभिषेक कपूर (Abhishek Kapoor) यांनी दिग्दर्शित केला होता. या ऐतिहासिक चित्रपटात त्याच्या भाचा आमन देवगण (Aaman Devgn) आणि रवीना टंडन (Raveena Tandon) यांची मुलगी रेशा ठडानी (Rasha Thadani) यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट जानेवारीमध्ये प्रदर्शित झाला होता, मात्र बॉक्स ऑफिसवर तो अपयशी ठरला.

दुसरीकडे, काजोलचा शेवटचा चित्रपट ‘दो पट्टी’ (Do Patti) हा एक थ्रिलर ड्रामा होता. या चित्रपटातून शाहीर शेख (Shaheer Sheikh) यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, तर शशांक चतुर्वेदी (Shashanka Chaturvedi) यांनी दिग्दर्शन केले होते. या चित्रपटात काजोलसोबत क्रिती सनोन (Kriti Sanon) दुहेरी भूमिकेत झळकली होती. ‘दो पट्टी’ हा चित्रपट गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित झाला होता.

News Title : Ajay Devgan Kajol’s Relationship in Trouble

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now