ऐश्वर्या आणि सलमान पुन्हा एकत्र?, ‘या’ चित्रपटासाठी भन्साळीने दिली होती ऑफर

On: January 29, 2025 5:16 PM
aishwarya rai
---Advertisement---

Aishwarya Rai | हम दिल दे चुके सनम’ आणि ‘देवदास’ सारख्या भव्य चित्रपटांच्या यशानंतर, भन्साळी आणि ऐश्वर्या राय यांच्यात एक मजबूत संबंध निर्माण झाले होते. त्यांना सलमान आणि ऐश्वर्या या जोडीला ‘पद्मावत’मध्ये एकत्र आणण्याची इच्छा होती. त्यांनी ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटाच्या सुरुवातीला देखील सलमान आणि ऐश्वर्या (Aishwarya Rai) यांना एकत्र काम करण्याची संधी दिली होती.

पण, त्यांच्या ब्रेकअपमुळे दोघांना एकमेकांसोबत काम करण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे संजय लीला भन्साळी यांनी 2015 मध्ये ‘बाजीराव मस्तानी’मध्ये रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांना मुख्य भूमिकेत घेतले आणि तो चित्रपट सुपरहिट (Superhit) ठरला.

ऐश्वर्याची अट आणि सलमानचा नकार

काही वर्षांनी ‘पद्मावत’साठी सलमान खान आणि ऐश्वर्या रायला घेण्याचे संजय लीला भन्साळी यांनी ठरवले. परंतु, ऐश्वर्याने एक अट ठेवली होती. ती चित्रपटात काम करेल, पण सलमान खानला नकारात्मक भूमिकेत, म्हणजेच अलाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत कास्ट करावे लागेल आणि दोघांचे दृश्ये एकमेकांपासून वेगळे ठेवावेत.

सलमान खानला ऐश्वर्यासोबत (Aishwarya Rai) काम करण्यात काहीच अडचण नव्हती, पण त्याला चित्रपटातील रोमँटिक कथा पाहायची होती, जशी त्याने ‘हम दिल दे चुके सनम’मध्ये ऐश्वर्यासोबत अनुभवली होती. त्यामुळे सलमान खानने या चित्रपटासाठी नकार दिला. या चित्रपटात रणवीर सिंगची खिलजीची भूमिका शाहरुख खानलाही देण्यात आली होती, परंतु त्याने ती नाकारली.

ऐश्वर्याची अट अमान्य-

अखेर, संजय लीला भन्साळी यांनीही ऐश्वर्याच्या तडजोडीला नकार दिला आणि रणवीर सिंगला अलाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत कास्ट करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर, दीपिका पदुकोणला पद्मावतीच्या (Padmavati) भूमिकेत आणि शाहिद कपूरला राजा रत्नसिंहच्या भूमिकेत घेतले. ‘पद्मावत’ 2018 मध्ये प्रदर्शित झाला आणि तो प्रचंड यशस्वी ठरला.

रणवीर सिंगचा अलाउद्दीन खिलजी म्हणूनचा अभिनय विशेष चर्चेत होता, ज्यामुळे चित्रपटाची लोकप्रियता आणखी वाढली. अशाप्रकारे, सलमान-ऐश्वर्याच्या जोडीला ‘पद्मावत’मध्ये एकत्र काम करण्याची संधी मिळाली नाही आणि रणवीर सिंगच्या (Ranveer Singh) भव्य नकारात्मक भूमिकेसोबत चित्रपट खूप मोठा हिट ठरला.

News Title : Aishwarya Rai to work with salman khan again

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now